अलिबाग: बोरघाटात मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे दृतगती मार्गावरील वाहतुकीचा खोंळबा झाला. बोरघाटात बॅटरी हीलजवळ झालेल्या भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याने शुक्रवारी संध्याकाळी महामार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथगतीने सुरू होती.

हेही वाचा : Sayaji Shinde : अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश केला? सयाजी शिंदे म्हणाले, “मला या पक्षाची स्ट्रॅटेजी…”

स्टील कारखान्यातील भंगार घेऊन एक ट्रक खोपोलीच्या दिशेने निघाला होता. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून बॅटरी हील जवळील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक कलंडला, त्यामुळे या ट्रक मधील भंगार मुंबई – पुणे दृतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पडले. यामुळे दृतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जुन्या महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात बाधित झाली होती. रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सरू आहेत.