Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर, आता सायंकाळी पाच वाजता मुळशी धरणातून ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी येथील अडणचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.

तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.

हेही वाचा >> मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार

केंद्रीय यंत्रणांकडून अटक टाळायची असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकल्याचा सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसंच, या शपथपत्रांसाठी देशमुखांवर दबाव टाकल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहूयात.

Live Updates

Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात.

13:12 (IST) 25 Jul 2024
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली…

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्‍यात सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे जांभुळपाडा आणि पाली येथील पुल पाण्याखाली गेले. त्यामुळे दोन्ही पुलांवरील वाहतुक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली. दुथडी भरून वाहणाऱ्या अंबा नदीचे पाणी पहाटे नागोठणे शहरात शिरण्यास सुरवात झाली. एसटी स्टँण्ड परीसर, शिवाजी नगर परीसर पाण्याखाली गेला आहे. बाजारपेठ परीसरातही पुरपरीस्थिती निर्माण झाली आहे.

13:08 (IST) 25 Jul 2024
Pune Heavy Rain :ऑफिसेसना आवश्यकतेनुसार ‘वर्क फ्रॉम होम’; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Heavy Rain Alert Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय आता कार्यालये, कंपन्यांच्या ऑफिसेसच्या कामकाजासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

वाचा सविस्तर…

13:05 (IST) 25 Jul 2024
रायगड जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या, मुंबई विद्यापीठाचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड – पाली या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना गुरूवार, २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

12:58 (IST) 25 Jul 2024
कल्याण-मुरबाड रस्ता जलमय

कल्याण : मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांचे पाणी परिसरातील गाव हद्दीत शिरल्याने कल्याण-मुरबाड रस्ता अनेक गाव हद्दीत जलमय झाला आहे. या रस्त्यावरील कल्याण ते अहमदनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सविस्तर वाचा…

12:41 (IST) 25 Jul 2024
Pune Rain Update : बारावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

12:34 (IST) 25 Jul 2024
Pune Rain : सिंहगड रस्त्यावर NDRF ची दोन पथके कार्यरत !

12:32 (IST) 25 Jul 2024
Mumbai Rain Update : भिवंडीत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

12:30 (IST) 25 Jul 2024
“हा न्यायालयाचा अवमानच!” व्हीएनआयटी व प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नागरिक संतप्त

नागपूर : अंबाझरीतील पुलाच्या बांधकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची उच्च न्यायालयाने दखल घेऊन व्हीएनआयटीच्या परिसरातून रस्ता सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या संस्थेने मुख्य रस्ता सुरू न करता पर्यायी रस्ता सुरू केला व तोही एकेरी आणि फक्त काही वेळासाठीच. त्यामुळे रस्ता सुरू करूनही वाहतूक कोंडी कायम असल्याने हा तर उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर…

12:28 (IST) 25 Jul 2024
Pune Rain Update : मुठा नदीपात्रातून होणारा विसर्ग वाढला, पुण्याला पाण्याचा विळखा!

12:26 (IST) 25 Jul 2024
पर्यटन नगरी लोणावळ्यात २४ तासात ३७० मिलिमीटर पाऊस; शाळांना दोन दिवसांची सुट्टी

पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात तब्बल विक्रमी ३७० मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

12:25 (IST) 25 Jul 2024
Pune Heavy Rain : पुण्यात कोसळधारा, ३८ ठिकाणी झाडे कोसळली

पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

वाचा सविस्तर…

12:24 (IST) 25 Jul 2024
डेक्कन जिमखाना येथील पुलाच्या वाडीत विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

डेक्कन जिमखाना भागातील पुलाची वाडी येथे मध्यरात्री विजेचा धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते.

वाचा सविस्तर…

12:23 (IST) 25 Jul 2024
Pune Heavy Rain : पुणे शहर, जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ… लवासामध्ये तब्बल ४५३ मिलीमीटर!

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी साडेसातपर्यंतच्या आकडेवारीनुसार लवासा येथे तब्बल ४५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

वाचा सविस्तर…

12:21 (IST) 25 Jul 2024
Pune Heavy Rain : खडकवासला धरणसाखळीत विक्रमी पाऊस, पुणे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 25 Jul 2024
हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले, नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पेण : हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत ८३ टक्के वाढ झाली असून धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदी पत्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

12:06 (IST) 25 Jul 2024
वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाची परंपरा खंडित; कारण काय? जाणून घ्या…

नागपूर : विदर्भातील दर्जेदार शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून नावारूपाला आलेला व स्मृतिदिनी आयोजित केला जाणारा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह यावर्षी मात्र त्यांच्याच नावाने असलेले सभागृह उपलब्ध होत नसल्यामुळे प्रथमच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला स्थगित करावा लागला आहे.

वाचा सविस्तर…

12:05 (IST) 25 Jul 2024
आधीच जिल्हा चिंब, आता यलो अलर्ट; कोट्यवधीचे रस्ते, पिके गेलेत वाहून

वर्धा : धोक्याचा असणारा पावसाचा यलो अलर्ट आज देण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. सलग पाच दिवसापासून जिल्ह्यात जोरधार सुरू आहे. नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागले आहे. जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा विळखा पडलेला.

वाचा सविस्तर…

11:46 (IST) 25 Jul 2024
नवी मुंबईतील शाळांना सुट्टी… सकाळच्या सत्रातल्या शाळा अर्ध्या दिवसानंतर सोडून देणार

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात सकाळपासूनच असलेला पावसाचा जोर पाहता शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शहरातील इयत्ता बारावी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 25 Jul 2024
४० फिरते दवाखाने मुरबाडच्या दुर्गम भागात पडून; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या जीपही वर्षभरापासून पडून

बदलापूर : करोनाच्या संकटकाळात ग्रामीण पट्ट्यातील दुर्गम भागातील रूग्णांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत फिरते दवाखाने अर्थात मोबाईल मेडीकल युनीट सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत २० रूग्ण तपासणी वाहने आणि त्यासोबत असलेल्या २० जीप गेल्या वर्षभरापासून मुरबाडच्या सरळगावजवळील कान्हर्ले ग्रामपंचायत हद्दीत उभ्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 25 Jul 2024
ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

ठाणे : जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा यामुळे जिल्हा प्रशासनाने पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 25 Jul 2024
मुंबई : विहार तलाव भरून वाहू लागला, पाणीसाठ्यात मोठी वाढ; सात धरणांतील जलसाठा ६६ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी विहार धरण गुरुवारी मध्यरात्री ३.५० वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले. आतापर्यंत सातपैकी तुळशी, तानसा आणि आता विहार धरण ओसंडून वाहू लागले आहे. सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आजघडीला पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

वाचा सविस्तर…

10:44 (IST) 25 Jul 2024
Maharashtra Rain Update : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे एक स्वयंचलित गेट (गेट क्र.6) उघडून पंचगंगा नदीची उपनदी भोगावती नदीत २९२८ क्युसेक विसर्ग करण्यात आला. राधानगरी धरणातून या अतिरिक्त विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पूर पातळीत आणखी वाढ होईल आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी बिकट होईल. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहून तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगितले आहे.

10:43 (IST) 25 Jul 2024
Mumbai Rain Update :

कुर्ल्यातील शीतल सिनेमा येथे पाणी साचले असल्याने बस क्रमांक ७, ३०२, ३०३, ५१७, ३२२ हे काळे मार्ग येथील मगन नथुराम मार्गावरून वळवण्यात आले आहेत.

10:42 (IST) 25 Jul 2024
Rain Update : ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने या घाट मार्गावरील वाहतूक ठप्प : रायगड पोलीस

10:40 (IST) 25 Jul 2024
पाणी साचल्याने बेस्टच्या बसचा मार्ग वळवला

पाणी साचल्यामुळे नॅशनल कॉलेज बस मार्ग क्रमांक सी-१, ४,८३,८४,२०१,२०२ हे मार्ग लिकिंग रोडवरून वळवण्यात आले आहेत.

10:39 (IST) 25 Jul 2024
Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी

10:39 (IST) 25 Jul 2024
चंद्रपूर: एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताची साखळी; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना…

चंद्रपूर : सलग ४८ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. अशातच वरोरा तालुक्यातील कोसरसार-बोडखा या पुलावरून पाणी वाहत असताना विद्यार्थांना वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी जीव मुठीत ठेवून पुरातून जीवघेणा प्रवास करीत एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून विद्यार्थी पुरातून मार्ग काढीत शाळेतून घरी व घरून शाळेत जावे लागत आहे.

वाचा सविस्तर…

10:38 (IST) 25 Jul 2024
अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती

अलिबाग- रायगड जिल्ह्यात सूरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, आंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पातळीत मोठी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे.

वाचा सविस्तर…

10:36 (IST) 25 Jul 2024
Pune Rain Update : “निसर्ग कोपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने…”, अजित पवारांच्या पुणेकरांना सूचना

निसर्ग कोपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने हाहाकार उडाला आहे. पुणे-पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री

10:30 (IST) 25 Jul 2024
Pune Rain Update : “लष्कर आणि हवाई दल सज्ज ठेवा”, पुण्यातील पूरस्थितीवर एकनाथ शिंदेंचे आदेश!

पुण्यातील परिस्थिती मी पाहतोय. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे आयुक्त, एनडीआरएफ यांच्या सातत्याने संपर्कात आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी माझं बोलणं चालू आहे. मी आता मेजर जनरल अनुराग वीर आणि कर्नल संदीप यांच्याशीही बोललो. लष्कर आणि हवाई दल सज्ज ठेवा. एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तर तेही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवा. शाळा आणि कार्यालयांना सुट्टी देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराची मदत घेतली जाणार आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>