Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात गुरुवारी पावसाने थैमान घातलं होतं. पण आता काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरण काय आहे. परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईत पावसाची स्थिती सामान्य झाला आहे. शाळा महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथील रस्तेवाहतूक पूर्वपदावर येत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. एकीकडे राज्यात पाऊसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Live Updates

Rain Update Today : मुंबईत पावसाचा जोर कमी; शाळा, महाविद्यालये सुरु राहणार

20:28 (IST) 26 Jul 2024
बुलढाणा : पाचशेची नोट देत मद्य मागितले, पण हातात पडल्या बेड्या…

पोलिसांनी लगेच दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करता आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली.

सविस्तर वाचा...

20:20 (IST) 26 Jul 2024
चंद्रपूर : दोघांचा बळी घेणारा ‘तो’ वाघ अखेर जेरबंद, भयग्रस्त नागरिकांना दिलासा

जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा आहे.

सविस्तर वाचा...

20:08 (IST) 26 Jul 2024
नाशिक: मिरवणुकीने स्वागत होणारा सराईत गुन्हेगार पुन्हा कारागृहात

नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी गुन्हेगारांकडून झालेली कृती ही कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे.

सविस्तर वाचा...

20:01 (IST) 26 Jul 2024
मुंबई: पश्चिम रेल्वेवर शनिवारी, तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

20:00 (IST) 26 Jul 2024
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटीबद्ध - शंभूराज देसाई

सातारा- सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या २७ ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हौतात्म दिनाच्या पूर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करु अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

20:00 (IST) 26 Jul 2024
मुंबई: ३३ वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.

सविस्तर वाचा...

19:59 (IST) 26 Jul 2024
वडिलांनी तक्रार केल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल, भाईंदरमध्ये हॉटेलच्या खोलीत तरुणाने घेतला गळफास

भाईंदर :- भाईंदरमध्ये एका हॉटेलच्या खोलीत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी पोलिसात तक्रार केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विकास सिंग (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो खासगी कंपनीत कामाला होता. १५ जुलै रोजी विकासचे वडील प्रकाश सिंग (४९) यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवसायाचे सात लाख रुपये भरले होते. मात्र वडिलांना न सांगताच त्याने ते पैसे खर्च केले होते. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.

19:32 (IST) 26 Jul 2024
“विजयाने हुरळू नका”, रवींद्र मिर्लेकर यांचा ठाकरे गटाच्या गटप्रमुखांना सल्ला

विजयाने हुरळून न जाता कमी मत मिळालेल्या ठिकाणी आपण मागे का पडलो याचा अभ्यास करा, असा कानमंत्र ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.

सविस्तर वाचा...

19:25 (IST) 26 Jul 2024
मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सहा विशेष गाड्या

यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते.

सविस्तर वाचा...

19:20 (IST) 26 Jul 2024
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील परीक्षा लांबणीवर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे.

सविस्तर वाचा...

18:55 (IST) 26 Jul 2024
नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका

निफाड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना होणारा धान्य पुरवठा विस्कळीत झाला असून धान्य वितरणास तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे.

सविस्तर वाचा...

18:43 (IST) 26 Jul 2024
नाशिक: सापडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या स्वाधीन, महिला सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

चित्रा वडनेरे या तपोवन कॉर्नर परिसरात २१ जुलैच्या रात्री पतीसमवेत शतपावली करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वडनेरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.

सविस्तर वाचा...

18:24 (IST) 26 Jul 2024
सोलापूर: उजनी धरण उपयुक्त पातळीनंतर झटपट वधारू लागले, दौंडमधून पाण्याचा विसर्ग १.८८ लाख क्युसेक

उजनी धरणात पुण्यातील खडकवासला धरणातून बंडगार्डनमार्गे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग दुपारी घटला.

सविस्तर वाचा...

18:11 (IST) 26 Jul 2024
शहरबात: नियोजन समिती नव्हे समस्या निवारण बैठक

जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघरवर अनेक वर्षांपासून विकास निधी वितरणाबाबत झालेला अन्याय दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती.

सविस्तर वाचा...

17:56 (IST) 26 Jul 2024
पुण्यात लोकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यात जोरदार पाऊस झाल्याने लोकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी गेलं. आता घाणीचं साम्राज्य आणि चिखल पाहण्यास मिळाला. त्यानंतर मी जिल्हाधिकारी पुणे, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना निर्देश दिले की पथकं नेमा आणि स्वच्छता करा. नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. प्रशासनाने नागरिकांना मदत करावी आणि त्यांचं आयुष्य पूर्ववत करावी यासाठी मी सूचना दिल्या आहेत. मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी आढावा घेतला आहे. गणपतीपूर्वी हे दोन्ही रस्ते व्यवस्थित करावेत असे निर्देश दिले आहेत. वेळ पडली तर मी पुन्हा त्या ठिकाणी व्हिजिट देईन असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. गोविंदांना विम्याचं कव्हर आम्ही यावर्षीही कायम ठेवलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

17:40 (IST) 26 Jul 2024
पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले

जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.

सविस्तर वाचा...

17:12 (IST) 26 Jul 2024
“भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा

मला भाजपने हरवले असताना असे कसे म्हंटले जाते, अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केली.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 26 Jul 2024
पावसाळ्यातही उत्तर महाराष्ट्रात २२४ टँकरव्दारे पाणी पुरवठा; ७४९ गाव, वाड्यांची तहान भागविण्याचे प्रयत्न

नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असताना उत्तर महाराष्ट्रातील ७४९ गाव-वाड्यांना आजही २२४ टँकरमधून पाणी पुरवठा करावा लागत आहे. या भागात टँकर आणि गावांची तहान भागवण्यासाठी एकूण २८३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 26 Jul 2024
जळगाव : उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कारानंतर दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात

जळगाव : उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तिपत्र देत सत्कार झालेला जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

सविस्तर वाचा....

16:42 (IST) 26 Jul 2024
नंदुरबार जिल्ह्यात सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी आले असून ग्रामीण भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. नवापूरमधील शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून रंगावली नदीला पूर आला आहे.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 26 Jul 2024
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पनवेलमध्ये काँग्रेसची निदर्शने

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी पनवेल प्रांत कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 26 Jul 2024
वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या हाती, ८३१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणार

मुंबई : निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.

सविस्तर वाचा....

16:13 (IST) 26 Jul 2024
गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक

कोल्हापूर जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट वाढत चालले आहे.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 26 Jul 2024
“अनिल देशमुखांच्या पेनड्राईव्हमध्ये काहीही नाही”; आशिष देशमुखांचा हल्लाबोल; म्हणाले, “दीड वर्ष...”

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर जे आरोप केले आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. मागील दीड वर्षांसापासून ते शांत बसले आणि निवडणुकीच्या तोंडावर आरोप करत आहेत. देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न हे. त्यांनी पेनड्राईव्ह बाहेर काढण्याचाही इशारा दिला. मात्र, त्या अनिल देशमुखांच्या पेनड्राईव्हमध्ये काहीही नाही, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली.

15:37 (IST) 26 Jul 2024
रत्नागिरी: राजापूर शहराला पुन्हा पुराचा फटका; पाच वेळा पुर आल्याने व्यापाऱ्यांचे हाल

शहरात आतापर्यंत पाच वेळा पाणी भरल्याने चांगलीच व्यापा-यांची दमछाक झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:27 (IST) 26 Jul 2024
समुद्राच्या लाटांचा गणपतीपूळे येथील गणपती मंदिराला तडाखा

पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळल्याने समुद्राला उधाण आले आहे.

सविस्तर वाचा...

15:27 (IST) 26 Jul 2024
माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद

माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवर वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 26 Jul 2024
नाशिक जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक शाळाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात

नाशिक : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पाच ते २० जुलै या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ६० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. निफाड तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 26 Jul 2024
‘एमपीएससी’ दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणार!

नागपूर : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या जाहीर झालेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे खेडकर प्रकरणामुळे आयोगाने असे कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

वाचा सविस्तर...

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,

(प्रातिनिधिक छायाचित्र / इंडियन एक्स्प्रेस)

गुरुवारी मुंबईत मुळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे.