Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात गुरुवारी पावसाने थैमान घातलं होतं. पण आता काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरण काय आहे. परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईत पावसाची स्थिती सामान्य झाला आहे. शाळा महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथील रस्तेवाहतूक पूर्वपदावर येत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. एकीकडे राज्यात पाऊसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Rain Update Today : मुंबईत पावसाचा जोर कमी; शाळा, महाविद्यालये सुरु राहणार
पोलिसांनी लगेच दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करता आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली.
जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा आहे.
नागरिकांमध्ये दहशत माजविण्यासाठी गुन्हेगारांकडून झालेली कृती ही कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सातारा- सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या २७ ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हौतात्म दिनाच्या पूर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करु अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.
भाईंदर :- भाईंदरमध्ये एका हॉटेलच्या खोलीत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी पोलिसात तक्रार केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विकास सिंग (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो खासगी कंपनीत कामाला होता. १५ जुलै रोजी विकासचे वडील प्रकाश सिंग (४९) यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवसायाचे सात लाख रुपये भरले होते. मात्र वडिलांना न सांगताच त्याने ते पैसे खर्च केले होते. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती.
विजयाने हुरळून न जाता कमी मत मिळालेल्या ठिकाणी आपण मागे का पडलो याचा अभ्यास करा, असा कानमंत्र ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते.
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे.
निफाड तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना होणारा धान्य पुरवठा विस्कळीत झाला असून धान्य वितरणास तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे.
चित्रा वडनेरे या तपोवन कॉर्नर परिसरात २१ जुलैच्या रात्री पतीसमवेत शतपावली करत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वडनेरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.
उजनी धरणात पुण्यातील खडकवासला धरणातून बंडगार्डनमार्गे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग दुपारी घटला.
जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पालघरवर अनेक वर्षांपासून विकास निधी वितरणाबाबत झालेला अन्याय दूर होईल, अशी आशा निर्माण झाली होती.
पुण्यात जोरदार पाऊस झाल्याने लोकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी गेलं. आता घाणीचं साम्राज्य आणि चिखल पाहण्यास मिळाला. त्यानंतर मी जिल्हाधिकारी पुणे, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना निर्देश दिले की पथकं नेमा आणि स्वच्छता करा. नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. प्रशासनाने नागरिकांना मदत करावी आणि त्यांचं आयुष्य पूर्ववत करावी यासाठी मी सूचना दिल्या आहेत. मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी आढावा घेतला आहे. गणपतीपूर्वी हे दोन्ही रस्ते व्यवस्थित करावेत असे निर्देश दिले आहेत. वेळ पडली तर मी पुन्हा त्या ठिकाणी व्हिजिट देईन असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. गोविंदांना विम्याचं कव्हर आम्ही यावर्षीही कायम ठेवलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते.
मला भाजपने हरवले असताना असे कसे म्हंटले जाते, अशी विचारणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केली.
नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असताना उत्तर महाराष्ट्रातील ७४९ गाव-वाड्यांना आजही २२४ टँकरमधून पाणी पुरवठा करावा लागत आहे. या भागात टँकर आणि गावांची तहान भागवण्यासाठी एकूण २८३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा…
जळगाव : उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तिपत्र देत सत्कार झालेला जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर पाणी आले असून ग्रामीण भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. नवापूरमधील शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून रंगावली नदीला पूर आला आहे.
मुंबई : निवासी डॉक्टर, अध्यापक, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट वाढत चालले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर जे आरोप केले आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. मागील दीड वर्षांसापासून ते शांत बसले आणि निवडणुकीच्या तोंडावर आरोप करत आहेत. देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न हे. त्यांनी पेनड्राईव्ह बाहेर काढण्याचाही इशारा दिला. मात्र, त्या अनिल देशमुखांच्या पेनड्राईव्हमध्ये काहीही नाही, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली.
शहरात आतापर्यंत पाच वेळा पाणी भरल्याने चांगलीच व्यापा-यांची दमछाक झाली आहे.
पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळल्याने समुद्राला उधाण आले आहे.
माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवर वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
नाशिक : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पाच ते २० जुलै या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यापैकी ६० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. निफाड तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
नागपूर : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या जाहीर झालेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे खेडकर प्रकरणामुळे आयोगाने असे कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र / इंडियन एक्स्प्रेस)
गुरुवारी मुंबईत मुळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे.