Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात गुरुवारी पावसाने थैमान घातलं होतं. पण आता काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरण काय आहे. परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईत पावसाची स्थिती सामान्य झाला आहे. शाळा महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. येथील रस्तेवाहतूक पूर्वपदावर येत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. एकीकडे राज्यात पाऊसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला २०० ते २२५ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Rain Update Today : मुंबईत पावसाचा जोर कमी; शाळा, महाविद्यालये सुरु राहणार

14:27 (IST) 26 Jul 2024
डोंबिवलीत देवीचापाडा येथील बेकायदा चाळी पुराच्या पाण्याच्या विळख्यात, खाडी किनारा बुजवून उभ्या केल्या होत्या चाळी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर भागात गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत उल्हास नदीचा खाडी किनाऱ्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील खारफुटी नष्ट करून उभारलेल्या सुमारे पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी गुरुवारपासून महापुराच्या पाण्याच्या विळख्यात आहेत.

सविस्तर वाचा…

14:24 (IST) 26 Jul 2024
अलीबागच्या समुद्र किनाऱ्यावर जहाज भरकटलं; १४ खलाशांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश

गुरुवारी दुपारी अलीबागच्या समुद्र किनाऱ्यावर जेडब्लूएस कंपनीचे जहाज भरकटलं होतं. या जहाजात १४ खलाशी असल्याची माहिती होती. दरम्यान, या खलाशांना आता भारतीय तटरक्षक दलाने वाचवलं आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.

सविस्तर वाचा

13:58 (IST) 26 Jul 2024
कल्याणमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या इसमाविरुध्द गुन्हा

कल्याण : इतिहासकालीन, चित्रपट अभिनय क्षेत्रातील जुन्या व्यक्तिंच्या छायाचित्रांची तोडमोड करून त्या जागी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सामायिक करून फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमा विरुध्द आंबिवलीमधील एका तरूणाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 26 Jul 2024
देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्यात षडयंत्र रचलं जातयं; दीपक केसरकरांचा आरोप!

देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्यात षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच आम्ही दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टीकलं असून ते सर्वोच्च न्यायालयातही टीकेल, असेही ते म्हणाले.

13:34 (IST) 26 Jul 2024
कल्याणमध्ये केस सजावटकार महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी

कल्याण : कल्याणमधील एका २१ वर्षाच्या केश सजावटकार (हेअर ड्रेसर) महिलेला तिच्या जुन्या मित्राने आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे, असे सांगून तिला कल्याण पूर्वेतील एका लॉजवर नेले. तेथे तिच्या मनाविरूध्द लैंगिक अत्याचार केले.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 26 Jul 2024
पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

पिंपरी : पाण्याची गढूळता वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरात २६ जुलै २०२४ रोजी दिवसभरात होणारा पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा, कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

सविस्तर वाचा…

13:16 (IST) 26 Jul 2024
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर निवळला, १० हजार घनफूटाने वाढवण्यात येणारा जलविसर्ग रद्द

कराड : पश्चिम घाटमाथ्यांसह कोयना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर आज शुक्रवारी सकाळी मावळला. कोयना पाणलोटात मुसळधार ओसरल्याने धरणाच्या सांडव्यावरुन दुपारी १२ वाजता प्रतिसेकंद १० हजार घनफूटाने वाढवण्यात येणारा जलविसर्ग रद्द करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 26 Jul 2024
“संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापूर्वी आधी स्वत:च्या हृदयात झाकून बघावं”, मनसेचं प्रत्युत्तर!

खोट्या नरेटीव्हला बळी पडायला आम्ही भाजपा नाही, संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापूर्वी आधी स्वत:च्या हृदयात झाकून बघावं, सत्ता मिळवण्यासाठी आपण काय घाणेरड्या खेळी केल्या, हे त्यांनी आठवून बघावं, असेही संदीप देशपांडे म्हणाले. तसेच २०१९ पूर्वी ज्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसून तुम्ही निवडणूक लढवली, तेव्हा ते महाराष्ट्राचे मित्र होते की शत्रू? वरळीत केमच्छो वरळीचे पोस्ट लावताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का? असा प्रश्नही त्यांनी संजय राऊतांना विचारला.

12:35 (IST) 26 Jul 2024
अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिल्या विशेष फेरीसाठी सर्वांना अर्ज करण्याची संधी

मुंबई : अकरावी प्रवेशाची ‘पहिली विशेष प्रवेश यादी’ सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. सुरुवातीच्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच, विशेष फेरीपासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यास प्रतिबंधित केले जाणार नाही.

वाचा सविस्तर…

12:34 (IST) 26 Jul 2024
गडचिरोली : भोंगळ कारभार! पहिलाच पाऊस अन एक हजार कोटींचे रस्ते उखडले…

गडचिरोली : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील एक हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ६ राष्ट्रीय महामार्ग आणि ५० हून अधिक राज्य व अंतर्गत मार्ग विविध ठिकाणी उखडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कायम चर्चेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वाचा सविस्तर…

12:09 (IST) 26 Jul 2024
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा,

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. यादरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पुण्यातील परिस्थितीबाबत लवकर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नागरिकांना कशाप्रकारे तत्काळ मदत दिली जाईल, यासाठी नियाजोन करू असं ते म्हणाले.

11:57 (IST) 26 Jul 2024
‘स्मार्ट सिटी’मध्ये काँक्रिटीकरण, अतिक्रमणाचा पूर

पुणे : विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली. तसेच, पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची कामे पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही खोटा ठरल्याचे उघड झाले.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 26 Jul 2024
“राज ठाकरे नुकताच परदेशातून आले, त्यांना…”; मनसेच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेवरून संजय राऊतांची खोचक टीका!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

सविस्तर वाचा

11:38 (IST) 26 Jul 2024
उल्हास नदीचे पाणी ओसरले, महामार्ग उखडला; बदलापुरात पाणी पातळी १४.७० मीटरवर

बदलापूर : गुरूवारी रौद्र रूप धारण करणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळीत शुक्रवारी घट दिसून आली. उल्हास नदीची पाणी पातळी सकाळी १४.७० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापूर शहरावरचे पूर संकट टळले आहे. गुरुवारी उल्हास नदी आहे १८.८० मीटर इतकी सर्वोच्च पाणी पातळी गाठली होती.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 26 Jul 2024
Pune Rain Update :

11:01 (IST) 26 Jul 2024
नागपूर : नवख्यांना ठाणेदारी, दुय्यमचे वांदे! निम्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात…

नागपूर : शहरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गुन्हेगारी वाढत आहेत. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी नियुक्त असायला हवे. परंतु, शहरातील ३४ पैकी तब्बल २१ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा सविस्तर…

10:50 (IST) 26 Jul 2024
पाऊस कहाणीच्या साठा ‘उत्तरी’… पुन्हा प्रश्नांचा पाऊसच!

पुणे : यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे शहराने गुरुवारी अनुभवले. पावसाच्या या थैमानात सात जणांचा बळी गेला. पाऊस जोरातच पडला, पण हवामान विभागाचे अगम्य इशारे, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव यांत भरडला गेला, तो सामान्य पुणेकर.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 26 Jul 2024
अलिबाग समुद्रात जे.एस.डब्ल्यू कंपनीचे बार्ज भरकटले, तटरक्षक दलामार्फत अडकले या खलाशांसाठी मदत व बचाव कार्य सुरू

अलिबाग : गुरुवारी अलिबाग समुद्रात जे एस डब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले. हे जहाज धरमतर कडून जयगडच्या दिशेने निघाले होते. या बार्ज वरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. अडकलेल्या खलाशांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत बाहेर काढले जात आहे.

सविस्तर वाचा…

10:28 (IST) 26 Jul 2024
एका महिन्यात राज ठाकरेंची भूमिका बदलते, हे आश्चर्यकारक – संजय राऊत

राज ठाकरे नुकताच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्याची भूमिका बदलते. हे आश्चर्यकारक आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

10:20 (IST) 26 Jul 2024
बीकेसीतील एमटीएनएल-एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे; उन्नत रस्ता वाहतुकीसाठी बंद, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड

मुंबई : सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील एमटीएनएल जंक्शन – एलबीएस मार्ग उन्नत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. याप्रकरणी कंत्राटदार जे. कुमारला ५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जोपर्यंत खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नाही, तोपर्यंत दिवसाला १० लाख रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर…

10:04 (IST) 26 Jul 2024
वर्धा : ‘समृद्धी’च्या नावाने शेतकरी मोडताहेत बोटं! शेतशिवारांचे झाले तलाव…

वर्धा : आर्थिक विकासाचा दूत म्हणून महामार्ग बांधणी होत असते. जलद व सुरक्षित वाहतूक साध्य झाल्यास प्रगतीचा आलेख उंचावतो, असे शासन सांगत असते. समृद्धी महामार्ग बांधतांना अशीच आकडेवारी सांगण्यात आली होती. मात्र, हा समृद्धीकडे की मृत्युंकडे नेणारा मार्ग, अशी टीका या मार्गावर घडलेल्या अनेक अपघातांमुळे सुरू झाल्याचे वास्तव आहे.

वाचा सविस्तर…

09:17 (IST) 26 Jul 2024
Anil Deshmukh: देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख यांचं पुन्हा आव्हान, “क्लिप्स असतील तर…”

Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगितलं होतं. मी तो आरोप केला नाही असं अनिल देशमुख म्हणाले. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांनी खुलं आव्हान दिलं आहे. फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले.

सविस्तर वाचा –

09:16 (IST) 26 Jul 2024
Jayant Patil Criticize Raj Thackeray : राज ठाकरेंच्या लाडका भाऊ अन् बहिणीच्या टीकेवरून जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “संपूर्ण जगाला…”

Jayant Patil Criticize Raj Thackeray : पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२५ जुलै) केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टोला मारला. त्यावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा –

09:15 (IST) 26 Jul 2024
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होतील – मंत्री चंद्रकांत पाटील

लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होतील. नागरिकांना योग्य ती मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे.

09:07 (IST) 26 Jul 2024
आजचा हवामान विभागाचा अंदाज काय?

आज राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार त्याचबरोबर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

09:00 (IST) 26 Jul 2024
पुण्यात पावसाचा जोर ओरसला; परिस्थिती हळू हळू पूर्वपदावर

पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. परिस्थितीही हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांच्या घरात चिखल झाला आहे. हा गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र / इंडियन एक्स्प्रेस)

गुरुवारी मुंबईत मुळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरु राहणार असल्याची माहिती आहे.