Maharashtra Political Crisis News, 07 October 2022 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर धनुष्यबाण निशाणी नेमकी कोणीची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या वादाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. त्यातच शिंदे गटाने अर्ज करुन उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर केला जाईल असा दावा केला आहे. याच कारणामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
याशिवाय नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे. तर, भाजपा नेते राम कदम यांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाला विरोध दर्शवलेला असताना, आता मनसेने या सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.
यासह राज्यभरातील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा वाचा फक्त एकाच क्लिकवर
Maharashtra Breaking News Updates : यासह राज्यभरातील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा वाचा फक्त एकाच क्लिकवर
पुणे : राज्यासह देशभरात लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळी विरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. राजकारणातील आघाड्यांमुळे मंत्री वेगवेगळे होतात; पण माझे गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू. क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे, मंत्रीही एकच असायला हवा. भविष्यात असा निर्णय झाल्यास ते फायदेशीर ठरेल . बातमी वाचा सविस्तर …
उरण : नगरपरिषदेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं आहे. त्यामुळे विरंगुळा म्हणून तलावात येणाऱ्या लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी व तलावातून ये जा करणाऱ्या उरण शहरातील नागरिकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बातमी वाचा सविस्तर …
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांच्या नातावाचाही उल्लेख केल्याने, एकनाथ शिंदेंना राग अनावर झाल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या त्या विधानवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आता यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…
नवी मुंबई : वाशी कृषी उत्पन्न बाजारात राज्यातील सर्व बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार(ई-नाम) च्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात येणार होती. त्यासाठी कांदा बटाटा बाजारात ई नाम योजनेअंतर्गत कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : सध्या राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. दसरा मेळाव्यात देखील त्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले . अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या वडगाव सहानी येथील ठाकरे – शिंदे यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत असुन यांचा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पंतप्रधानांची वेळ घेण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पुणे : गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी २७० रुपये किमतीच्या वस्तू केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील नऊ लाख १६ हजार ३७१ कुटुंबांना लाभ होणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
नाशिक : इडलीचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडून पाच लाख आठ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा आणि ३३०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. बातमी वाचा सविस्तर …
मालेगाव : शिधापत्रिका मिळविण्यासाठी तालुक्यातील कौळाणे येथील अस्लम रहीम शेख या अपंगाने अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिझवले, परंतु प्रत्येक वेळी रिक्त हस्ते परतावे लागण्याचीच प्रचिती त्यास येत गेली. एक दिवस मात्र जणू चमत्कार झाला आणि अवघ्या तासाभरात त्याच्या हातात शिधापत्रिका पडली. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे शंभराहून अधिक नगरसेवक विजयी झाले, तरच भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असे मी समजेन. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अठरा ते वीस तास काम करण्याची तयारी ठेवावी. शिंदे गटाच्या जागाही निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली. बातमी वाचा सविस्तर …
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करुन शहरातील माता बाल रुग्णालयांची सार्वजनिक रुग्णालये केली. वर्षानुवर्ष रुग्णालयाच्या टोलेजंग इमारती फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या.परंतू करोनाच्या काळात याच इमारतींच्या सुविधा वाढवून आता खाजगी रुग्णालयासारख्या चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : रासायनिक शेती विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. पर्यावरण, पाणी, जमीन आणि गोमातेचे संरक्षण करायचे असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. रासायनिक शेतीइतकेच उत्पादन नैसर्गिक शेतीतून मिळते. देशातील जनतेला विषमुक्त अन्नधान्य देऊन कर्करोगा सारख्या आजाराच्या विळख्यापासून जनतेला दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती करा, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. बातमी वाचा सविस्तर …
पिंपरी : महागाई, बेरोजगारीसारखे महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून आणली जात आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादाला अवास्तव प्रसिद्धी दिली जात असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. बातमी वाचा सविस्तर …
नवी मुंबई : शुक्रवारी पहाटे कोपरखैरणे सेक्टर २० येथील जनित्रात तांत्रिक बिघाड झाला . त्यामुळे सेक्टर१७,१८,१९ सी येथे वीज पुरवठा खंडित झाला.पहाटे ५ च्या सुमारास सेक्टर२० येथील जनित्रात बिघाड होऊन आग लागली होती. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील २४ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पंतप्रधानांची वेळ घेण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वाचा सविस्तर बातमी…
मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. यादरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. वाचा सविस्तर बातमी…
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा निकाल लावताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या माध्यमातून भरुन घेतलेली प्रतिज्ञापत्र कामी येणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचसंदर्भात ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांनी माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…