Maharashtra Legislative Assembly Session : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रविवारी (७ जुलै) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धिम्या गतीने चालू आहे. तसेच रस्ते देखील जाम आहेत. अनेक रस्ते आणि चौकांमध्ये पाणी साचलं आहे. तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशनही चालू झालं आहे. त्यामुळे आज दिवसभरात आपण मुंबईसह राज्यातील पावसाचे अपडेट्स आणि अधिवेशनातील घडमोडींवर लक्ष ठेवणार आहोत. इतर महत्त्वाच्या बातम्या देखील या लाईव्ह न्यूज ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Day 1 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

12:11 (IST) 8 Jul 2024
नागपूर : दीक्षाभूमी पार्किंग वाद; शेजारची जागा मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

नागपूर : दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगचा वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. आता हा वाद संपविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. दीक्षाभूमीला शेजारची आरोग्य विभागाची १६.४४ एकर व कापूस संशोधन संस्थानची ३.८४ एकर जमीन दिली जावी, यासाठी अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी उच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे.

सविस्तर वाचा….

12:10 (IST) 8 Jul 2024
मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकातून घरी

कल्याण – रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे शहर परिसराला झोडपून काढले. या पावसाने भांडुप, कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे सोमवारी सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांना आपण मिळेल त्या लोकलने मुंबईत कामाच्या पहिल्याच दिवशी पोहोचू असे वाटले, पण कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये आल्यावर प्रवाशांना मुंबईला जाणाऱ्या लोकल अनियमित वेळेने धावत असल्याचे आणि येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने बहुतांंशी प्रवाशांनी नाके मुरडत घरी जाणे पसंंत केले.

सविस्तर वाचा….

12:09 (IST) 8 Jul 2024
नागपूर ते लंडन: चक्क कारने १६ हजार किलोमीटरचा प्रवास

नागपूर : नागपूरच्या एका दाम्पत्यासह ११ लोकांनी नागपूर ते लंडन असा १६ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क कारने केला. ६५ दिवसांच्या या प्रवासात रस्त्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात २१ देशांच्या सीमा यांनी ओलांडत नागपूरकरांनी ही कामगिरी केली आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 8 Jul 2024
Mumbai Rains : मुंबईत मुसळधार का ?

संपूर्ण मुंबईत एकाचवेळी सर्व भागात सारखा पाऊस पडत नाही. काही ठिकाणी मुसळधार पाऊस असतो तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतात. यामुळे विभागानुसार पावसाच्या नोंदीत तफावत जाणवते अशी माहिती हवामान विभागाचे सुनील कांबळे यांनी दिली.

वाचा सविस्तर…

12:08 (IST) 8 Jul 2024
गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना सल्ला

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.

11:41 (IST) 8 Jul 2024
Mumbai Local Update : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

मुंबई : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी दादर येथून ठाण्यापर्यंत धिम्या मार्गावर उपनगरीय सेवा विलंबाने सुरू होती. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

वाचा सविस्तर…

11:39 (IST) 8 Jul 2024
पुणे : कामावर आला नाही म्हणून मोटारीची धडक अन्…

पुणे : कामावर न आल्याने शेतमजुरावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना खडकवासला धरण परिसरातील मांडवी बुद्रुक गावात नुकतीच घडली. मजुरावर कोयत्याने वार करण्यात आल्यानंतर त्याची पत्नी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन निघाली होती. त्यावेळी शेतमजूर दाम्पत्याला आरोपीने मोटारीने धडक दिली.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 8 Jul 2024
मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील महापालिका, शासकीय, खाजगी माध्यमांच्या सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता दुपारच्या सत्रातील शाळांना तसेच महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा….

11:36 (IST) 8 Jul 2024
ठाण्यातील तीन हात नाका येथे भिंत कोसळून मोठं नुकसान

ठाण्यातील तीन हात नाका येथे एक मोठं झाड उन्मळून पडलं. हे झाड एका इमारतीच्या कम्पाऊंड वॉलवर पडल्यामुळे भिंतही कोसळळी. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. एका निर्मामाधीन इमारतीच्या बाजूला असलेली कम्पाऊंड वॉल ढासळली आहे.

11:35 (IST) 8 Jul 2024
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या परीक्षा पुढे ढकलल्या, आज होणाऱ्या परीक्षा १३ जुलैला होणार

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही दिसत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) आज सोमवार, ८ जुलै रोजी पहिल्या सत्रात म्हणजेच सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 8 Jul 2024
“हे औटघटकेचं सरकार, लवकरच परतीचा प्रवास…”, पावसातील मुंबईची स्थिती पाहून वडेट्टीवारांचा टोला

पावसामुळे राज्याची राजधानी मुंबईची तुंबई झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक रस्ते बंद आहेत तर कित्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यासह मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मुंबईची ही स्थिती पाहून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, दररोज सकाळी उठलं की किती आणि कसे पैसे मोजता येतील? याचा विचार करून वेगवेगळ्या फायलींवर सह्या केल्या जातात. हा एकमेव धंदा डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील प्रशासन आणि राज्य सरकार काम करत आहे. त्यामुळेच मुंबईची ही अवस्था होण्याला राज्यातील सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन जबाबदार आहे. या लोकांमुळेच मुंबईची दुरवस्था झाली आहे. हे औट घटकेचं सरकार असून लवकरच त्यांच्या परतीचा प्रवास सुरू हईल.

मुंबईत सहा तासांत ३०० मिमी पावसाची नोंद (फोटो-ANI)

मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचलं

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.

हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.