पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. कराड) येथे झालेल्या अपघातात कुर्ला येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांचे वडील अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले तर मंगेश कुडाळकर (४१) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजण या अपघातात जखमी झाले आहेत.कुडाळकर कुटुंबीय कोल्हापूरला निघाले होते. वाठार येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर त्यांची तवेरा गाडी आदळून सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातामध्ये अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले. कल्पना अनंत कुडाळकर (वय ६३) आणि नेहा मंगेश कुडाळकर (वय ३८) यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जय मंगेश कुडाळकर (वय १२) हाही जखमी आहे. मंगेश कुडाळकर यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
या अपघातामध्ये यश मंगेश कुडाळकर (वय १४) बचावला असून ट्रकचा चालक सिकंदर जमखंडीकर हाही जखमी झाला आहे. ट्रक पुण्याच्या दिशेकडे तोंड करून थांबला होता तर मोटार कोल्हापूरच्या दिशेने निघाली असताना हा अपघात झाला.
कराडजवळ अपघातात मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्याचे वडील ठार
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. कराड) येथे झालेल्या अपघातात कुर्ला येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांचे वडील अनंत कुडाळकर (वय ६५) यांचे जागीच निधन झाले तर मंगेश कुडाळकर (४१) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजण या अपघातात जखमी झाले आहेत.
आणखी वाचा
First published on: 27-11-2012 at 04:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais one of shivsena leaders father died in accident in karad