सोलापूर : सोलापूरचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रथमच सोलापुरात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लावलेला फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हा फलक पुन्हा आहे त्या ठिकाणी उभारण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील सात रस्ता भागात शासकीय विश्रामगृहासमोर हा प्रकार घडला. पालकमंत्री गोरे हे सोलापूर शहरात प्रथमच येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृहासमोर भाजप कार्यकर्त्यांनी स्वागताचे फलक उभारले होते. परंतु सोलापूर महानगरपालिकेने शासकीय विश्रामगृहाच्या परिसरासह संपूर्ण सात रस्ता भागात फलक निषिद्ध क्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित केले आहे. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने या फलकावर कारवाई केली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश घोडके यांनी तो लावला होता. त्यांनी याबाबत जाब विचारात शासकीय विश्रामगृहासमोर रस्त्यावर ठिय्या मारला, त्यामुळे गोंधळ सुरू झाला. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करीत घोडके यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर आगपाखड केली. पालकमंत्र्यांच्या स्वागताचा फलक लावायचा नाही का, असा उलट सवाल त्यांनी केला. पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात नेले. परंतु आश्चर्य म्हणजे नंतर अवघ्या एका तासात हटविण्यात आलेला डिजिटल फलक पुन्हा नव्याने आहे त्या ठिकाणीच उभारण्यात आल्याचे पाहायला मिळाले.