आज अमरावती बंदची हाक
महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचे आदेश कुठल्याही क्षणी निघू शकतात, असे संकेत आहेत. त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी नगरसेवकांनी दबावगट तयार करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शुक्रवारी येथील राजकमल चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, तर उद्या, शनिवारी अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे.
अल्पावधीतच अमरावतीत लोकप्रिय ठरलेल्या चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या १३ महिन्यांमध्ये बदली होणे अनेकांना रुचलेले नाही. मात्र, काही हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी गुडेवार यांना माघारी पाठवण्याचा विडा उचलला होता. त्यांच्या बदलीची चर्चा सुरू असतानाच अनेक नगरसेवक उघडपणे त्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकले. चंद्रकांत गुडेवार यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करू द्यावा, त्यांची मध्येच बदली करू नये, असा ठराव गुरुवारी स्थायी समितीत एकमताने संमत करून लगोलग नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली. बसपानेही आयुक्तांची बदली करू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. त्यांच्या बदलीने विकासकामांना खीळ बसेल, त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी नगरसेवक प्रशांत वानखडे, सुनील काळे, प्रदीप बाजड, धीरज हिवसे, अब्दूल रफिक, नंदकिशोर वऱ्हाडे, अरुण जयस्वाल, प्रवीण मेश्राम, राजू मानकर, डॉ. राजेंद्र तायडे आदींनी केली आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल मोर्चा काढून त्यांची बदली करू नये, या मागणीचे निवेदन सादर केले. गुडेवार अमरावतीत आयुक्तपदी राहणे आवश्यक असून, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांची बदली थांबवावी; अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा स्वाभिमानने निवेदनात केली आहे. गुडेवार रुजू झाल्यापासून महापालिकेच्या कामात पारदर्शकता आली आहे. विविध करांच्या स्वरूपात महापालिकेच्या तिजोरीत मोठय़ा प्रमाणावर रक्कम जमा झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. महापालिकेची मालमत्ता बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी गुडेवार यांनी प्रयत्न केले. त्यांची बदली झाली, तर पालकमंत्र्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असेही निवेदनात नमूद आहे.

सोलापूरपेक्षा वेगळी स्थिती
चंद्रकांत गुडेवार हे सोलापूर महापालिका आयुक्त असताना सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांचा अवमान केला होता, त्यामुळे वैतागून गुडेवार यांनी थेट बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून निघून जाणे पसंत केल्यावर सोलापूरकर गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. नंतर त्यांचे स्वागतही गुढी उभारून करण्यात आले होते, पण या वेळी महापालिकेतील सत्ताधारी त्यांच्या बाजूने असताना काही दुखावलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीचा घाट घातल्याचे बोलले जात आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Due to low response to half marathon police are forced to fill 300 applications and focus on ticket sales affecting law and order
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Pune Municipal Corporation takes action against seven private hospitals in Pune for violating rules Pune print news
पुण्यातील सात खासगी रुग्णालयांकडून नियमभंग! महापालिकेने उचलले कारवाईचे पाऊल 
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
Story img Loader