नोटिसा पाठविल्याने रहिवाशी धास्तावले, वसई-विरारमध्ये धोकादायक इमारतीचा प्रश्न कायम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
विरार : वसई-विरारमध्ये करोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा अधिकारी कर्मचारी त्यावर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे. करोना संकटाच्या काळात या इमारतींमधून जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात केल्याने रहिवाशी धास्तावले असून ‘करोना’च्या संकटात कुटुंबासह राहायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धोकादायक इमारतीसंदर्भात महापालिका कोणतेही धोरण राबवत नसल्याने वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शेकडो धोकादायक इमारतीत राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. धोकादायक इमारतींना नोटीस पाठवण्याचे काम महापालिकेने आता सुरुवात केले आहे.
पालिकेच्या २०१९च्या अहवालानुसार प्रभाग ‘अ’च्या हद्दीत अतिधोकादायक सात व एकूण धोकादायक २५ इमारती आहेत. प्रभाग समिती ‘ब’च्या हद्दीत ३३ अतिधोकादायक इमारती तर एकूण धोकादायक इमारती ८७ आहेत. प्रभाग समिती ‘क’मध्ये अतिधोकादायक ४६ तर एकूण ६६ धोकादायक इमारती आहेत. प्रभाग समिती ‘ड’च्या हद्दीत अतिधोकादायक २० व एकूण धोकादायक ६० इमारती आहेत. प्रभाग समिती ‘ई’च्या हद्दीत ३७ अतिधोकादायक इमारती असून एकूण १५६ इमारती आहेत. तर प्रभाग समिती ‘एफ’च्या हद्दीत एक अतिधोकादायक इमारत असून एकूण तीन इमारती आहेत, प्रभाग समिती ‘जी’च्या हद्दीत सहा अतिधोकादायक इमारती असून एकूण ८५ इमारती आहेत, प्रभाग समिती ‘एच’च्या हद्दीत १२ अतिधोकादायक तर एकूण धोकादायक इमारती २०५ आणि प्रभाग ‘आय’च्या हद्दीत १७ अतिधोकादायक इमारती असून एकूण ५३ इमारती आहेत.
७४३ धोकादायक इमारती
* प्रशासनाच्या मागील वर्षीच्या माहितीनुसार पालिका क्षेत्रात ७४३ धोकादायक इमारती आहेत. त्यात अतिधोकादायक १७८ इमारती आहेत.
* धोकादायक अवस्थेतील इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणाऱ्या १७८ इमारती आहेत, तर रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणाऱ्या २७१ इमारती आहेत. किरकोळ दुरुस्तीसाठी १८६ इमारती प्रतीक्षेत आहेत.
* अशा इमारतींमध्ये तब्बल ४३९६ कुटुंबे म्हणजे सरासरी १० हजार लोक राहात आहेत. कधीही पडण्याची शक्यता असलेल्या इमारतीत ६५०हून अधिक कुटुंबे राहात आहेत.
आम्ही सर्व प्रभाग समिती यांना धोकादायक इमारतीची सद्य:स्थिती घेण्याचे आदेश दिले आहेत. काम ७० टक्क्यांहून अधिक झाले आहे. यात काही इमारतींना नोटीस बजावल्या आहेत, तर काही इमारतींना पुननिर्माणाच्या परवानगी देण्यासाठी पालिका विचाराधीन आहे. तसेच अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. आवश्यकता असल्यास महापालिका नागरिकांच्या रहिवाशांची सुविधासुद्धा करेल.
– किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका