सांगली : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगलीत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ३१ अनाधिकृत होर्डिंग असल्याचे आढळले असून ती हटविण्याची मोहिम बुधवारी हाती घेण्यात आली. यापुढे कोणतीही बेकायदा कृती सहन केली जाणार नाही असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिला. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त श्री. गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

हेही वाचा >>> मोहोळजवळ जुगार अड्डा उद्ध्वस्त; एक कोटीचा मुद्देमाल जप्त; सुरत, रत्नागिरीतून आलेले व्यापारी सापडले

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

यानुसार उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होल्डिंगचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये मनपक्षेत्रात एकूण ३१ होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्तांच्या  आदेशाने  आजपासून अनधिकृत होल्डिग हटवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आज प्रभाग समिती १ अंतर्गत येणार्‍या कोल्हापूर रोडवरील २० बाय ४० फूट  मापाचा मोठ्या होर्डिंगचा सांगाडा सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेंनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आला. यापुढेही अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असून संबधित होर्डिंग मालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे असा इशारा उपआयुक्त श्री. साबळे यानी दिला.