बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सटवा ग्यानबा मुंडे (६८), सुबाबाई ग्यानबा मुंडे (७०) अशी मृतांची नावे आहेत. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

माजलगावमध्ये एकाच दिवशी शिक्षकासह तिघांची आत्महत्या

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) एकाच दिवसात शिक्षकांसह तिघांनी आत्महत्या केली. राजवाडी गावातील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. राजेगाव येथील एका ४० वर्षांच्या व्यक्तीने व्यवहारातील जाचक त्रासाला कंटाळून गळफास लावून घेतला, तर केसापुरी कॅम्प येथे एका शिक्षकाने नैराश्यातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेश रामकिसन बडे (३७) असे या शिक्षकाचे नाव आहे.

हेही वाचा : राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपातप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपी डॉ. सुदाम मुंडेला ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

राजेवाडी गावात कृष्णा बालासाहेब ठोके (१९) या युवकाने कंबरेच्या पट्ट्याने राहत्या घरी गळफास घेतला. रामचंद्र धुराजी गरड (४०) यांनी व्यवहारातील पैशांसाठीच्या सततच्या तगाद्याला कंटाळून राजेगाव शिवारातील एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

Story img Loader