शहरालगतच्या जामडोह येथे अनतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच खून करण्यात आला. शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून देविदास लखमा गुजरे, असे मृताचे नाव आहे. खूनाच्या घटनेच्या काही कालावधीनंतर यातील तीन आरोपींनी शहर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मृताच्या बहिणीने या खुनाची माहिती अगोदरच शहर पोलिसांना दिली होती. जामडोह हे आदिवासी पोडेसदृश छोटे गाव असून, या घटनेने तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील मृत हाही निगराणी गुंड असून, त्याच्यावर यापूर्वी खुनासह प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहे. प्राप्त माहितीनुसार मृत देविदास लखमा गुजरे हा यातील मुख्य आरोपी रतन शंकर वाटोळकर याच्याकडे दररोज जेवण करायला जात होता. यातूनच मृताचे व आरोपीच्या पत्नीचे सुत जुळले. मृत जेवायला गेल्यानंतर याच परिसरातील पप्पू, बाल्या, भिडी हे तीन तरुणही आरोपी रतन वाटोळकरकडे जेवण्यास जात होते. मात्र, हे तिघे मृत देविदास व रतनच्या पत्नीच्या अनतिक संबंधात अडसर ठरू लागले, तसेच आपल्या या संबंधाची माहिती पती व इतरांना कळू नये म्हणून रतनच्या पत्नीने पप्पू, बाल्या, भिडी यांचे जेवण बंद करून घरी येण्यास मज्जाव केला. यामुळे पप्पू, बाल्या, भिडी यांचा राग अनावर झाला, तसेच त्यांना रतनच्या पत्नीचे देविदाससोबत असलेल्या अनतिक संबंधाचीही कुणकुण लागली होती.
या तिघांनीही रतन वाटोळकर यांना भेटून आमचे जेवण बंद केल्याने तुझे आíथक नुकसान होत आहे, तसेच देविदास व रतनच्या पत्नीच्या अनतिक संबंधाबाबतची माहिती दिली. यामुळे चिडलेल्या रतनने पप्पू, बाल्या, भिडीला सोबत घेऊन देविदासला ठार मारण्याचा कट रचला. तत्पूर्वी रतनचे मृत देविदाससोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. दरम्यान, देविदासला एकटे गाठून या चौघांनीही कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार मारले व आरोपींनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. तसेच या घटनेची माहिती फिर्यादी शोभा कुंभेकर हिने शहर पोलीस ठाण्याला दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयावरून कुऱ्हाडीचे घाव घालून खून
शहरालगतच्या जामडोह येथे अनतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच खून करण्यात आला.
आणखी वाचा
First published on: 22-07-2015 at 07:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder case in yavatmal