तालुक्यातील आखोणी येथील वडारवस्ती येथे काल, रविवारी रात्री अकराच्या सुमारास, न्यायालयातील खटला काढून घेत नाही म्हणून अब्बाशा दागिन्या काळे (वय ४८) याचा कोयत्याने वार करून निर्घुण  खून करण्यात आला. या वेळी झालेल्या मारहाणीत संजना अब्बाशा काळे, ललिता दिलीप भोसले, मनीता अब्बाशा काळे, कावेरी नवनाथ काळे व गुलछडी अब्बाशा काळे या पाच महिला जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. सर्व जण फरारी आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक चिंतले यांनी भेट दिली. तालुक्यात खून, दरोडे, चो-या, मारामा-यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी संजना अब्बाशा काळे (रा. आखोणी) हिने फिर्याद दिली आहे. काल रात्री घराच्या बाहेर झोपलेलो असताना तिथे बंड्या तरत-या काळे, बाक्या बंडया काळे, मिथुन बंडया काळे, गोटया बंडया काळे, सलीम्या अभिमन्यू काळे (सर्व रा. आखोणी)  विष्णू काळे, (करपडी) भिव्या शोभिचंद काळू भोसले (रा. काष्टी, श्रीगोंदे), मुक्या भोसले व त्याचे चार मुले व बाक्याचे मेहुणे गज, कोयते घेऊन आले व त्यांनी अब्बाशा काळे याला आमच्या विरुद्घ कोर्टात असलेली केस काढून का घेत नाही असे म्हणून वार केले व गजाने मारहाण केली. अब्बाशा जागीच मरण पावला. आम्ही सोडवण्यासाठी गेलो असता त्यांनी महिलांना मारहाण केली.
या सदंर्भात पोलिसांनी १२ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक  पठाण हे पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader