वाई: कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हिवरे (ता कोरेगाव) येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला होता. याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, यांच्या पथकाने वाठार पोलीस स्टेशनबरोबर समांतर तपास सुरू केला.

हेही वाचा – “मोदींच्या नवभारताचा रस्ता महाराष्ट्रातूनच जातो”, डॉक्टरेट मिळाल्यानंतर फडणवीसांनी वाचला राज्यातील विकासाचा पाढा!

पथकाने मृत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलामध्ये माहिती घेतली. तसेच जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली. सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केल्या असल्याबाबतचा संशय निर्माण झाला होता. मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती त्यानुसार हा खून विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळकट झाला होता. खताळ यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.

हेही वाचा – सोलापूर : लागोपाठ तीन तरुणींच्या आत्महत्या; कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असूनही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोपटली पोलिसांची पाठ

खताळ यांना मानसिक दृष्ट्या आपल्याला कॅन्सर झालेला आहे, अशी भीती सातावत होती. तोच त्रास आपल्या मुलाला असल्यास व आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला. वाठार पोलिसांनी खताळ याला अटक केली आहे.

Story img Loader