दारु पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही याचा राग आल्याने परप्रांतीय बांधकाम मजुरावर चाकुने केलेल्या हल्यात त्याचा औषोधोपचार चालू असताना मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साकुरी हद्दीत घडली. या बाबत राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनुसिंह यादव (वय ३५, मुळ रा.मध्यप्रदेश) असे मयत मजुराचे नाव आहे. सोनुसिंह हा इतर मजुरांसमवेत साकुरी हद्दीतील हॉटेल फिलींग स्टेशनच्या पाठीमागे अनिल तोरडमल यांचे बांधकाम चालू आहे. या ठिकाणी मयत सोनुसिंह हा मजुरीचे काम करीत होता. शुक्रवारी आरोपी अक्षय दाभाडे हा तेथे येऊन सोनुसिंह याच्याकडे दारु पिण्यासाठी ५० रुपये मागत होता. सोनुसिंह याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन आरोपी अक्षय दाभाडे याने सोनुसिंह याच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. यामध्ये सोनुसिंह गंभीर जखमी झाला. ही घटना कुणाला सांगितली तर तुम्हालाही जीवे ठार मारु असा दम दाभाडे याने इतरांना दिला. सोनुसिंह यास उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
सुरतसिंह लोधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षय दाभाडे यांच्याविरुद्ध राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पन्नास रुपयांसाठी मजुराचा खून
दारु पिण्यासाठी ५० रुपये दिले नाही याचा राग आल्याने परप्रांतीय बांधकाम मजुरावरचाकुने केलेल्या हल्यात त्याचा औषोधोपचार चालू असताना मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साकुरी हद्दीत घडली.
First published on: 19-05-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of labourer for fifty rupees