सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेमध्ये तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तिसऱया महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगली पोलीसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
सुनीता विजय पाटील (रा. वायफळे), प्रभावती ब्रह्मदेव शिंदे (रा. हिवरे) असे जागीच मृत्युमुखी पडलेल्या दोन महिलांची नावे आहेत. तिसऱया महिलेचे नाव अद्याप समजलेले नाही. या घटनेमुळे हिवरे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
(घटनास्थळाबाहेरचे छायाचित्र)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा