सालाबादप्रमाणे याही वर्षी मैफील अलिबाग या सांस्कृतिक संस्थेकडून येत्या १६ आणि १७ फेब्रुवारीला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ शााळेच्या प्रांगणात होणाऱ्या या महोत्सवात प्रतिभावान तसेच होतकरू कलाकार सहभागी होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात १६ फेब्रुवारीला होणार असून या दिवशी ख्यातनाम संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा यांचे संतूरवादन होणार आहे, तर त्यांना तबल्यावर नव्या पिढीचेच तबलावादक पं. सुरेश तळवलकरांचे चिरंजीव सत्यजित तळवलकर साथ देणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव यांचे गायन होणार आहे. त्यांना प्रसाद करंबेकर यांची तबल्यावर, तर संवादिनीवर अनंत जोशी साथ करणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात सायली तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना स्वप्निल भिसे तबल्यावर, तर श्रीराम हसबनीस संवादिनीवर साथ करणार आहे. तर महोत्सवाचा समारोप पंडित विजय घाटे यांच्या तबलावादनाने होणार आहे.
त्यांना लेहरावर साथ श्रीराम हसबनीस करणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील या नामांकित कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची संधी अलिबागकरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या संगीत महोत्सवासाठी जास्तीत जास्त संगीत रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मैफील अलिबाग संस्थेकडून करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये मैफील संगीत महोत्सवाचे आयोजन
सालाबादप्रमाणे याही वर्षी मैफील अलिबाग या सांस्कृतिक संस्थेकडून येत्या १६ आणि १७ फेब्रुवारीला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ शााळेच्या प्रांगणात होणाऱ्या या महोत्सवात प्रतिभावान तसेच होतकरू कलाकार सहभागी होणार आहे.
First published on: 16-02-2013 at 05:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical festival arrangement in alibaug