सालाबादप्रमाणे याही वर्षी मैफील अलिबाग या सांस्कृतिक संस्थेकडून येत्या १६ आणि १७ फेब्रुवारीला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आरसीएफ शााळेच्या प्रांगणात होणाऱ्या या महोत्सवात प्रतिभावान तसेच होतकरू कलाकार सहभागी होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात १६ फेब्रुवारीला होणार असून या दिवशी ख्यातनाम संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा यांचे संतूरवादन होणार आहे, तर त्यांना तबल्यावर नव्या पिढीचेच तबलावादक पं. सुरेश तळवलकरांचे चिरंजीव सत्यजित तळवलकर साथ देणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात किराणा घराण्याचे पंडित कैवल्यकुमार गुरव यांचे गायन होणार आहे. त्यांना प्रसाद करंबेकर यांची तबल्यावर, तर संवादिनीवर अनंत जोशी साथ करणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात सायली तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना स्वप्निल भिसे तबल्यावर, तर श्रीराम हसबनीस संवादिनीवर साथ करणार आहे. तर महोत्सवाचा समारोप पंडित विजय घाटे यांच्या तबलावादनाने होणार आहे.
त्यांना लेहरावर साथ श्रीराम हसबनीस करणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील या नामांकित कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेण्याची संधी अलिबागकरांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या संगीत महोत्सवासाठी जास्तीत जास्त संगीत रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मैफील अलिबाग संस्थेकडून करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा