जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यापूर्वी रथाला चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे. मुस्लिम बांधव (कारागीर) रथाला आणि पालखीला चकाकी देण्याचं काम दरवर्षी करतात. पालखी सोहळा म्हटलं की सर्वधर्म समभाव असा संदेश दिला जातो त्याच एक उदाहरण असल्याचे पाहायला मिळते.
घनश्याम गोल्ड यांच्याकडून दरवर्षी तुकोबांच्या पालखी, रथाला चकाकी देण्याचे काम करण्यात येतं. मोठ्या श्रद्धेने मुस्लिम कारागीर रथाला चकाकी देण्याचे काम करतात. गेल्या सात वर्षापासून हे काम अविरतपणे सुरू असल्याची माहिती कारागीरांनी दिली आहे. जातीच्या पलीकडे जाऊन हे काम करण्याचा एक वेगळा अनुभव आणि त्याच समाधान असल्याचं कारागीर सांगतात. चिंचेचे पाणी, रिटा, सोडा आणि लिंबू पाणी याचा वापर करून रथाला चकाकी आणण्यात येते. लाखो वारकऱ्यांचं देहू हे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने आषाढी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होतात, यावर्षी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे.