राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे. या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे विधान केले आहे. तसेच अल्पसंख्याकांनी सर्वच क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे, असेही पवार म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

“आजघडीला कला, लेखन किंवा कविता असो या सर्वच क्षेत्रात योगदान देण्याची मोठी क्षमता अल्पसंख्याकांमध्ये आहे. बॉलिवडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिलेले आहे? बॉलिवूडच्या प्रगतीसाठी मुस्लीम समाजाने सर्वाधिक योगदान दिलेले आहे. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही,” असे शरद पवार म्हणाले. तसे वृत्त एएनआयने दिले आहे.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Gautam Adani-Sharad Pawar meeting is fact says Hasan Mushrif
गौतम अदानी-शरद पवार बैठक, ही वस्तुस्थिती – हसन मुश्रीफ
Sharad Pawar criticize BJP in pune said concentrated power is corrupt
शरद पवार म्हणाले, केंद्रित झालेली सत्ता…
shankar prasad allegation on congress
ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप

नागपुरात बोलत असताना त्यांनी मुस्लीम समाजातील वेगवेगळ्या समस्या आणि अडचणींवरही भाष्य केले. “देशातील एक मोठा घटक असूनही आम्हाला योग्य सोई-सुविधा मिळत नाहीत, अशी मुस्लीम समाजाची भावना आहे. या भावनेत तथ्य आहे. या सोई-सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी विचारविनिमय व्हायला हवा,” अशी इच्छाही शरद पवार यांनी व्यक्त केली.