लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू असून सर्वच स्टार प्रचारक विविध राज्यांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विविध राज्यात भेटी देत तेथील मतदारांकडे एनडीएच्या मतांचा जोगवा मागितला आहे. दरम्यान, मते मागताना विरोधकांवर त्यांनी सडकून टीका केली. राजस्थानातील बन्सवाडा येथे त्यांनी काँग्रेसवर टीका करताना मुस्लिम समुदायाचाही उल्लेख केला. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“पूर्वी जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. संपत्ती एकत्र करून हे कोणाला वाटणार? याचा अर्थ ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ही संपत्ती वाटणार. घुसपेठियांना (घुसखोरांना) वाटणार. तुमच्या मेहनतीच्या कमाईचा पैसा घुसपेठियांना दिला पाहिजे हे तुम्हाला मंजूर आहे का? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हे नमूद आहे, की ते आई-बहिणीच्या सोन्या-दागिन्याची झडती घेणार, माहिती घेणार आणि मग ती संपत्ती वाटून देणार. आणि त्यांना वाटणार ज्यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हा शहरी नक्षलवादाचा विचार आपल्या महिलांकडचं मंगळसूत्रही वाचू देणार नाहीत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा >> Video: “काँग्रेस मुस्लिमांना, जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल”, पंतप्रधान मोदींचं राजस्थानच्या सभेत विधान!

जितेंद्र आव्हाडांनी केली टीका

नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही.”

हेही वाचा >> “मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला

“जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Story img Loader