तुळजाभवानी मंदिरातील गरव्यवहार, दानपेटीतील कोटय़वधींचा भ्रष्टाचार, तसेच अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंची लूट, अतिमहत्त्वाच्या भाविकांवरील सत्कारावर उधळपट्टी या सर्व गरप्रकारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
तुळजाभवानी मंदिरात मागील २० वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्याची राज्य सरकारने सीआयडीमार्फत चौकशी लावली आहे. मागील २० वर्षांत जगदंबेच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने, चांदी व मौल्यवान वस्तूंची लूट करणाऱ्या अनेकांची सीआयडी चौकशी करून तसा प्राथमिक अहवालही औरंगाबादच्या आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती आहे. सहा वर्षांपासून मंदिरातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार चव्हाटय़ावर आले आहेत. तुळजापूर येथील पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी माहितीच्या अधिकाराचे हत्यार वापरत हे सर्व प्रकार उजेडात आणले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा