राज्यातल्या शिंदे-भाजपा सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे. शिवसेना आणि भाजपाच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मी महायुतीला आणि राज्यातल्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो. टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या या आनंद आश्रमात उत्साहपूर्ण जल्लोषात ठाणेकरांनी हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, शुभेचा देतो आणि अभिनंद करतो.
एकनाथ शिंदे म्हणाले, मला वर्षभरापूर्वीचे दिवस आठवतायत. आपल्या राज्यात, मुंबईत, सगळीकडे, देशभर आणि जगभरात काय तो माहोल झाला होता. एक वेगळं वातावण आपल्याला पाहायला मिळालं. तेव्हाची परिस्थिती तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यावळी सर्वसामान्यांच्या मनात एकच विचार होता की, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं, त्यांच्या हक्काचं सरकार राज्यात स्थापन झालं पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ ला शिवसेना भाजपाची अधिकृतपणे युती झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या, बाळासाहेब ठाकरेंचे फोटो, त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो होता. मोदींचा फोटो दाखवून आम्ही घराघरांत मतं मागितली. आमचं सरकार पुन्हा येणार असं वाटलं होतं, तसं बहुमतही मिळालं. परंतु दुर्दैवाने निवडणुकीचे निकाल घोषित झाले आणि तात्काळ लोकांचे काही खुलासे बाहेर येऊ लागले. माध्यमांसमोर ते वेगवेगळी भाष्य करू लागले.
हे ही वाचा >> “…त्यासाठी मला भलतंच धाडस करावं लागलं”, सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांच्या मनात पाप होतं, ज्यांच्या मनात काही काळंबेरं होतं ते म्हणाले आमच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर दुर्दैवाने नको होतं तेच झालं. महा आघाडी आघाडी स्थापन झालं. परंतु याच महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली आधीच्या सरकारच्या काळातल्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजना आणि प्रकल्प बंद केले. मंत्रिमंडळात मी सुद्धा होतो. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही मी होतो, त्यामळे मला सगळं माहिती आहे.