Aurangabad Clases MVA Rally vs BJP Yatra Live: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेविषयी कमीलीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही राज्यातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआची जाहीर संयुक्त सभा असल्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी भाजपा-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्राही संभाजीनगरमध्येच काढली जात असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीमुळे आज मविआकडून कोणती भूमिका मांडली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!
तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आधी स्वत:च्या कानफटात मारून घे. आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाहीये. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे – उद्धव ठाकरे
मोठी केलेली माणसं गेलीत, पण त्यांना मोठं करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचं, भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आहेत – उद्धव ठाकरे
नड्डा म्हणाले शिवसेनेला नामशेष करा. आधी तुम्ही शिवसेना पेलतेय का ते बघा. आम्ही भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
तुम्ही महान व्यक्तींची नावं घेणार असाल, तर त्यांना अभिमान वाटेल असं किमान वागून दाखवा. मग तुमचं प्रवचन आम्हाला द्या. नुसती सत्ता पाहिजे. दिली ना सत्ता. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन हे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिलं होतं. एका पुत्रानं त्याच्या पित्याला दिलेलं हे वचन आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. मी हे स्पष्ट शब्दांत अमित शाहांना सांगितलं होतं. नाही ऐकलं. जर ऐकलं असतं, तर काय झालं असतं? आजही तुम्ही शिवसेना फोडली आणि डोक्यावर दगड ठेवून घेतलात ना? चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की ह्रदयावर दगड ठेवून हे ओझं स्वीकरालंय. भाजपाला मी विचारतोय, की मिंध्यांचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार आहात का? – उद्धव ठाकरे
कशाला छत्रपतींचं नाव घेता? छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराची ओटी भरून तिला परत पाठवली होती. ते आमचं हिंदुत्व आहे. पण तुम्ही सगळ्यांना छळता. धाडी टाकता. एक इथला गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व? तुमचा एक गद्दार सुषमा अंधारेंबद्दल खालच्या पातळीची टीका करतो. तुझ्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. आत्ता जर हे शिवसेनेत असते, तर त्यांची तसं बोलायची हिंमत नव्हती. त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढावी. हे शोभत नाही – उद्धव ठाकरे
हिंडेनबर्ग रिपोर्टवर राहुल गांधी बोलले, तर त्यांना अपात्र ठरवलं जातं. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारायचं नाही. का? तुम्ही आम्हाला विचारता ना घराघरांत ईडी, सीबीआय घुसवून? तासनतास चौकशी करत होतात. अनिल देशमुखांना उगीच बसवून ठेवलं होतं. त्यांच्या नातीचीही चौकशी करत होता तुम्ही – उद्धव ठाकरे
आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. काय दिलं आजपर्यंत? राजेश टोपे इथे बसलेत. करोनाच्या काळात सगळेच मैदानात उतरले होते. आजरी राजेश टोपेंना औषधाचं नाव विचारलं तर ते सांगतील.. पण आत्ताचे जे आरोग्यमंत्री आहेत… राहू द्या.. त्यांच्यावर कोणत्याही बाबतीत काही बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही – उद्धव ठाकरे
तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात. सभेतही वाचू का, वाचू का विचारता. त्यांना मला सांगायचंय, की तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही – उद्धव ठाकरे
मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. पुन्हा एकदा सांगतो त्यांना. हिंमत असेल, अगदी भाजपातही हिंमत असेल, तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो. होऊन जाऊ द्याय. जेव्हा हवं तेव्हा वापर करुन घेतलात. काय काय चालली होती तुमची थेरं? उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा. पण आज माझ्याकडे काहीही नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष कठीण काळातही सोबत आहेत. काय तुम्ही माझं चोरणार? माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद माझ्यासमोर बसलेत. ते तर तुम्ही चोरू शकत नाही ना? – उद्धव ठाकरे
जेव्हा हे महाराष्ट्रात अस्पृश्य होते, तेव्हा आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं. नाहीतर यांना महाराष्ट्रात ओळखत कोण होतं? जेव्हा गरज होती तेव्हा भाजपानं आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवर चढल्यावर आपल्याला लाथ मारतायत. त्याच तंगड्या धरून आपल्याला त्यांना खाली खेचायचंय आता. आज मी मुख्यमंत्री नाहीये. आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह त्यांनी चोरलंय. एवढंच नाही, माझे वडीलही चोरायचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या वडिलांना किती वेदना होत असतील. काय दिवटं कार्टं, याला बापसुद्धा दुसर्याचा लागतो – उद्धव ठाकरे
गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ५० खोक्यांना. एका कांद्याला ५० खोके, तर त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळाले पाहिजेत? हे सगळं तोतयेगिरीचं सरकार चालू आहे – उद्धव ठाकरे
मी घराबाहेर पडलोच नाही. पण जे काम मी घरात राहून केलं, ते तुम्ही गुवाहाटी वगैरे वणवण फिरुनही करू शकला नाहीत हे महाराष्ट्र बघतोय – उद्धव ठाकरे
पीकविमा योजना ऐकून आम्हाला लाज वाटायला लागली की काय बाबा राजा उदार झाला आहे. आपलं सरकार होतं, तेव्हा आपण हे का नाही केलं? पण आम्ही जे बोललो, ते आम्ही दिलं – उद्धव ठाकरे
गंगापूरला अतिवृष्टी झाली होती. मला माहिती नाही, त्याचे पैसे मिळाले की नाही. आता अवकाळी झाली, गारपिटी झाली होती. पीकविम्यासंदर्भात आपण बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न करत होतो. तुंबळ योजना या सरकारनं जाहीर केल्या आहेत. पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनी एकच रुपया द्यायचा म्हणे. काय दानशूर आहे सरकार. पण जेव्हा शेतकरी विम्याचे पैसे मागायला जातो. तेव्हा त्याच्या हातावर १० रुपयांचा चेक दिला जातो – उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्रानं एक मालकधार्जिणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो महाराष्ट्रात लागू होऊ दिला नाही. पण आता हे मिंधे सरकार राज्यात तो कायदा लागू करू बघतंय – उद्धव ठाकरे
हे जगतमित्र आहेत. ओबामांनाही हाय ओबामा, काय रे ओब्या असं म्हणतात. सगळेच यांचे मित्र. इस्रायलमध्ये लाखोंच्या संख्येनं नागरिक, पोलीस, सगळे अधिकारी संपावर गेलेत. रस्त्यावर उतरलेत. राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांना झापलं. असे राष्ट्रपती पाहिजेत. तिथे पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं. अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यायला लागला. याला म्हणतात लोकशाही. आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही वाट्टेल ते करावं आणि आम्ही मेंढरासारखं बे बे करत तुमच्या मागून यायचं ही लोकशाही नाही – उद्धव ठाकरे
भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहेत. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायला मागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल – उद्धव ठाकरे
जर वल्लभभाई नसते, तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही, हा प्रश्न आहे. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. पण तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? वल्लभभाईंपासून काहीतरी घ्या ना. घुसवा फौजा पाकव्याप्त काश्मीरमध्ये. निवडणुका आल्या की लुटुपुटूचं काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या – उद्धव ठाकरे
आम्ही तुमचं हिंदुत्व मानायला तयार नाही आहोत. देशात एक विधान, एक निशाण असं तुम्हाला राबवायचं आहे. दुसरा पक्षच तुम्हाला शिल्लक ठेवायचा नाहीये. देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. सावरकरांचं स्वप्न होतं आसिंधू-सिंधूपर्यंत अखंड हिंदुस्थान. वर बसलेल्यांची हिंमत आहे का? अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. मी म्हटलं मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानी. नाहीतर पुचाट लेकाचे हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. तिकडे टाका ना धाडी – उद्धव ठाकरे
भाजपाचं म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललंय. देशभरातली भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. आणि नाव भाजपा आहे. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा – उद्धव ठाकरे
तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय ताटता आहात? – उद्धव ठाकरे
नितीश कुमार आणि लालूंचं सरकार पाडून तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? आता मोदी म्हणतायत की त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम चाललंय. कोण करतंय? आम्ही करतोय का? आमची प्रतिमा नाहीये का? तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय – उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीवरून वार करतो? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत. अमित शाहांनी पुण्यात म्हटलं की सत्तेसाठी मी तळवे चाटले. असं नाहीये की मी शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? – उद्धव ठाकरे
पदवी दाखवणार नाही, हा कुठला न्याय आहे? पदवीचा उपयोग काय दंड घेण्यासाठी करताय की काय? – उद्धव ठाकरे
हल्ली काहींना डॉक्टरेटही मिळते. काहीजण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात. सोडून द्या त्यांना. पण आज अनेक तरुण पदवीधर होतायत. पदवी दाखवूनही एकीकडे किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कॉलेजलाही हा अभिमान असायला हवा की आमच्या कॉलेजमधला एक व्यक्ती पंतप्रधान झालाय – उद्धव ठाकरे
मी काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल, तर मुफ्ती मोहम्मद सैद यांच्यासोबत तुम्ही काश्मीरात मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल, तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे – उद्धव ठाकरे
मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथे मी हिंदुत्व सोडलंय. मी आत्ता इथून घरी जाऊन बसेन, तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही – उद्धव ठाकरे
जातीय तेढ निर्माण झाली की समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत काढला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश कऱण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती – उद्धव ठाकरे
२५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आलं. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं का? म्हणून मला अभिमान वाटतो, मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं. निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची – उद्धव ठाकरे
याच शहरात १९८८ साली महापालिका शहरवासीयांनी शिवसेनेच्या ताब्यात दिली. याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं. तेव्हाच शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की आजपासून या शहराचं नाव मी बदलून संभाजीनगर करतोय – उद्धव ठाकरे