Aurangabad Clases MVA Rally vs BJP Yatra Live: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेविषयी कमीलीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही राज्यातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआची जाहीर संयुक्त सभा असल्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी भाजपा-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्राही संभाजीनगरमध्येच काढली जात असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीमुळे आज मविआकडून कोणती भूमिका मांडली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

Live Updates

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

19:58 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा… – उद्धव ठाकरे

ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलाच नाहीये. उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच दिसतोय – उद्धव ठाकरे

19:54 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: काहीजण फक्त वातावरण खराब करून… – अजित पवार

काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही, तर कुणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही – अजित पवार

19:53 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

यांना गौरवयात्रा काढायचं सुचतंय. तुमच्यात धमक असेल, खरंच सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत? फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे चाललंय. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचं काय कारण होतं? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही? – अजित पवार

19:49 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: यांचा पायगुण चांगला नाहीये, म्हणूनच… – अजित पवार

उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग इथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे – अजित पवार

19:48 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: या सरकारला काही जनाची नाही, मनाची आहे का? – अजित पवार

मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का? – अजित पवार

19:47 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

यांच्या लोकांकडून अनेक महापुरुषांची बदनामी झाली. तेव्हा यांची दातखिळ बसली होती का? मध्ये सावरकरांबाबत काहीतरी बोललं गेलं. पण वडिलकीच्या नात्याने समजावून सांगितल्यानंतर ते वातावरण निवळलं. इथे गौरवयात्रा काढायला आमचा विरोध नाही. पण तुम्ही दुटप्पी राजकारण करता. छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, पण त्यांचा अपमान झाला तेव्हा तुम्हाला राज्यपालांना थांबवता आलं नाही. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही – अजित पवार

19:45 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: तुम्ही स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि …

तुम्ही स्वत:ला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवता आणि मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान करता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली की खास दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा. पण तसा दिलदारपणा या मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही – अजित पवार

19:43 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसैनिकांबाबत बोलायला किती वेळ दिला? १३ मिनीट? एवढी उपेक्षा मराठवाडा स्वातंत्र्यसेनानींसाठी इतर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नसेल. तेवढी या मुख्यमंत्र्यांनी केली – अजित पवार

19:42 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? – अजित पवार

एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली. आयोग जर असे निर्णय द्यायला लागलं, तर कसं होणार? न्यायदेवतेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायदेवता न्याय देईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही – अजित पवार

19:40 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: … हे महाराष्ट्राला परवडणार नाही – अजित पवार

आम्ही अनेक वर्षं राज्यकर्ते, विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. पण अशा प्रकारे कुठला निकाल दिलेला आमच्यातरी ऐकिवात नाहीये. कायद्याचा, संविधानाचा आदर करण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. पण याला तिलांजली देण्याचं काम झालं. ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, तसं घडत राहिलं, तर देशात स्थिरता राहणार नाही. ती देशाला परवडणार नाही – अजित पवार

19:39 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

मविआ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी सगळे जीवाचं रान करतील. सगळे कार्यकर्ते मविआचा कणा या नात्याने लढतील – अजित पवार

19:37 (IST) 2 Apr 2023
MVA Rally:

सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मविआचं सरकार सत्तेत आलंय. आपला उद्देश तळापर्यंत पोहोचवण्यासाठी सभा घेऊ. पण तेव्हा करोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही. नंतर काही राजकीय घटना घडल्या आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं मविआ सरकार पायउतार झालं – अजित पवार

19:25 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: एवढा भला माणूस मी पाहिला नाही – अशोक चव्हाण

एवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न, निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. करोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती – अशोक चव्हाण

19:21 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आत्ताचं सरकार सत्तेत आलं – चव्हाण

आजच्या सत्ताधाऱ्यांनी आमदारांची फोडाफोडी केली. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्हही गेलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची करणारं सरकार सध्या सत्तेत आहे – अशोक चव्हाण

19:18 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही – चव्हाण

ही विराट सभा पाहिल्यावर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे. देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत स्थिती मविआची आहे. कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहेत. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे – अशोक चव्हाण

19:14 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: …तर मविआ १८० पेक्षा जास्त जागा जिंकेल – थोरात

आपण एकत्र राहिलो, व्यवस्थित राहिलो तर राज्यात १८० पेक्षा जास्त जागा आपण जिंकू – बाळासाहेब थोरात

19:13 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: …याचा अर्थ असा, की वातावरण बदलतंय – थोरात

भाजपा असं समजतो की कसब्यात दगड उभा केला तरी निवडून येईल. पण जनतेनं तिथे भाजपाला नाकारलं. चिंचवडध्ये फूट पडली नसती, तर तिथेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असता. कर्नाटक निवडणुकीच्या सर्वेतही काँग्रेस विजयी होणार असल्याचं दिसतंय. याचा अर्थ वातावरण बदलतंय – बाळासाहेब थोरात

19:11 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: अदाणींच्या खात्यावर २० हजार कोटी आले कुठून? – थोरात

अदाणींच्या खात्यावर २० हजार कोटी आले कुठून? यावर उत्तर द्यायला अद्याप कुणी तयार नाही. या प्रश्नांचं उत्तर न देता खासदारकी काढून घेतली जाते असा हा देश सध्या चालला आहे – बाळासाहेब थोरात

19:11 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: राहुल गांधींनी फक्त मोदी आणि अदाणींच्या संबंधाबाबत विचारलं होतं – थोरात

राहुल गांधींनी विचारलं अदाणी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? उत्तर न देता त्यांचं भाषण कामकाजातून बाहेर काढलं. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागूनही त्यांना बोलू दिलं नाही – बाळासाहेब थोरात

19:09 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते – थोरात

जो कुणी विरोधात बोलेल, त्याच्याघरी ईडी जाऊन पोहोचते, पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. पण आमच्याविरोधात कुणी बोललेलं चालणार नाही अशी परिस्थिती केंद्रात आणि राज्यात आहे. राहुल गांधींनी याविरोधात भारत जोडो पदयात्रा काढली. ३५६० किलोमीट पायी चालले. ती एक यशस्वी पदयात्रा झाली – बाळासाहेब थोरात

19:05 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: संजय राऊतांनी पुढाकार घेतला, सोनिया गांधींनी पाठिंबा दिला, शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं आणि मविआ अस्तित्वात आली – बाळासाहेब थोरात

उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी पुढाकार घेतला. सोनिया गांधींनी त्याला पाठिंबा दिला. शरद पवारांचं त्याला मार्गदर्शन लाभलं आणि महाविकासआघाडी अस्तित्वात आली. आम्ही अडीच वर्षांचा एक ऐतिहासिक कालखंड काम केलं. आधी आम्ही सात मंत्री होतो. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आमची बैठक घेतली. आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं.

18:57 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: धनंजय मुंडेंनी सांगितली राहत इंदौरींची एक आठवण!

मी राहत इंदोरींची मुलाखत ऐकत होतो. त्यांनी आणीबाणीचा काळ सांगितला. ते म्हणाले त्या काळात मी सरकारला चोर म्हटलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मला ठाण्यात बोलवून चौकशी केली की तुम्ही सरकारला चोर कसं म्हणालात? राहत इंदोरी म्हणाले, मी भारत किंवा पाकिस्तान किंवा अमेरिकेच्या सरकारला चोर म्हटलेलं नाही. मी तर फक्त सरकार चोर आहे असं म्हणालो. पोलीस म्हणाले, इंदौरी साहब, आप हमें इतना बेवकूफ समझते हो, हमें मालूम नहीं कौन सी सरकार चौर है? – धनंजय मुंडे

18:55 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: सरकारला जर चोर म्हटलं, तर कधी आपलं सदस्यत्व जाईल, सांगता येत नाही – मुंडे

आता अशी परिस्थिती आहे की सरकारच्या विरोधात कुणी काही बोललं तर कधी पोलीस घरात येतील हे काही सांगता येत नाही. सरकारला जर चोर म्हटलं, तर कधी आपलं सदस्यत्व जाईल, सांगता येत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं वक्तव्य केलं कुठे, निकाल लागला कुठे आणि सदस्यत्व रद्द झालं कुठे. सरकारविरोधात जे कुणी बोलेल, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय – धनंजय मुंडे

18:53 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: सरकार घाबरलंय, म्हणून यात्रा काढतंय – धनंजय मुंडे

वज्रमूठ सभेची घोषणा झाल्यानंतर त्याच तारखेला सावरकर गौरव यात्रा निघाली. मला वाटलं, हे ताकद दाखवण्यासाठी यात्रा काढतायत की मविआच्या ताकदीला घाबरून यात्रा काढतायत. मविआच्या वज्रमुठीला सरकार एवढं घाबरलंय, की जिथे वज्रमूठ सभा होईल, तिथे मुख्यमंत्र्यांची यात्रा नक्कीच होईल – धनंजय मुंडे

18:50 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: १ एप्रिल भाजपाचा वर्धापन दिन म्हणून साजरा होईल – मुंडे

ज्या दिवशी वज्रमूठची महाराष्ट्रातली शेवटची सभा होईल, त्या दिवशी महाराष्ट्रातील १२ कोटी जनता १ एप्रिल म्हणजे भाजपाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केल्याशिवाय राहणार नाही.

18:49 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: जनतेला खऱ्या अर्थानं कुणी फुल बनवलं असेल, तर ते कमळाच्या फुलानं – धनंजय मुंडे

आजच्या सभेला सुरुवात कुठून करावी? काल १ एप्रिल झाला. चार दिवसांनंतर ६ एप्रिल आहे. त्या दिवशी भाजपाचा स्थापना दिवस आहे. पण गेल्या १० वर्षांचं देशातलं राजकारण पाहिलं, तर २०१४ पासून ज्या निवडणुका झाल्या, जनतेला खऱ्या अर्थानं कुणी फुल बनवलं असेल, तर ते कमळाच्या फुलानं बनवलंय – धनंजय मुंडे

18:43 (IST) 2 Apr 2023
पश्चिमचा आमदार काय गडबड करतो? – खैरे

पश्चिमचा आमदार काय गडबड करतो? आमचंं राज्य येऊ द्या. ते खोके कुणाकडून कसे कुठे गेले हे बाहेर येईल – चंद्रकांत खैरे

18:42 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: इथले पालकमंत्री फक्त ढेऱ्या हलवतात – चंद्रकांत खैरेंचा टोला

इथले पालकमंत्री फक्त ढेऱ्या हलवतात. पाच दारुच्या दुकानांना इथे परवानगी मिळाली नाही. पण ९ दुकानांना परवानग्या मिळाल्या. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजून जिवंत केलं आणि चालायला लावलं. हे दारू पाजतात. असे मंत्री काय कामाचे? – चंद्रकांत खैरे

18:39 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: सावरकरांना भारतरत्न का नाही दिला? – खैरे

सावरकरांना भारतरत्न देण्याची आम्ही कितीवेळा मागणी केली. पण तुम्ही त्यांना भारतरत्न दिला नाही. आता काय त्यांच्या नावाने राजकारण करता? – चंद्रकांत खैरे

18:36 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: पोलिसांवर नागपूरवाल्यांचा दबाव होता – खैरे

ही सभा होऊ द्यायची नाही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं राजकारण चालू आहे. चुकून निवडून आलेल्या इम्तियाज जलीलला १७ दिवस बसू दिलं. त्याला काहीच केलं नाही. रात्रभर धिंगाणा केला त्यानं तिथे. पण पोलिसांनी काहीही केलं नाही कारण त्यांच्यावर दबाव होता नागपूरवाल्यांचा – खैरे

महाविकास आघाडीची संयुक्त सभा (संग्रहीत छायाचित्र)

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!