Aurangabad Clases MVA Rally vs BJP Yatra Live: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेविषयी कमीलीची उत्सुकता निर्माण झाली होती. ही राज्यातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआची जाहीर संयुक्त सभा असल्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी भाजपा-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्राही संभाजीनगरमध्येच काढली जात असल्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीमुळे आज मविआकडून कोणती भूमिका मांडली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

Live Updates

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

18:35 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: त्यांनी हे खरं सांगितलं की शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं – खैरे

ते काय म्हणाले होते, की घरी बसले होते. पण उद्धव ठाकरेंनी घरी बसूनही आम्हाला वाचवलं होतं. आता आरोग्यमंत्री कुठेतरी बसून काहीतरी बोलतो. एक त्यांनी खरं सांगितलं, की शिवसेना फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं – चंद्रकांत खैरे

18:34 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: मिंधे सरकारचं करोनाच्या लाटेकडे लक्ष नाहीये – खैरे

सगळे मिंधे, गद्दार बडबड करत बसतात. आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सर्वांसमोर आहे. अडीच वर्षं आघाडीनं अप्रतिम काम केलं. आता करोनाची लाट पुन्हा येत आहे. मिंधे सरकारचं त्याकडे लक्ष नाहीये. फक्त कुठेतरी जाऊन काहीतरी कार्यक्रम करायचा असं त्यांचं चाललंय – चंद्रकांत खैरे

18:28 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून जास्त मस्ती करू नका – अंबादास दानवे

पोलिसांना विनंती करतो.. सभेला येणाऱ्यांसाठी जुबली पार्कजवळ येऊ द्यायचं हे आपलं ठरलं आहे. पण बाबा पेट्रोल पंपाजवळ किमान ८०० गाड्या आत्ता उभ्या आहेत. नाहीतर आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस आमचा राहील हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून जास्त मस्ती करू नका ही माझी नम्र विनंती आहे. बैठकीत आपलं ठरलं होतं. पण केम्ब्रिज शाळेजवळही गाड्या थांबवल्या आहेत. त्या गाड्या जालना रोडवरून यायचं ठरलं होतं, पण तुम्ही झालटा फाट्यावरून पाठवता. जर पोलिसांना मस्ती आली असेल, तर जिरवून दाखवू हेही मी तुम्हाला सांगून ठेवतो. गाड्या थांबवू नका ही माझी पोलिसांना नम्र विनंती आहे – अंबादास दानवे

18:19 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: एकनाथ शिंदेंचा मविआच्या सभेवर हल्लाबोल…

शिवसेना-भाजपाची विचारांची युती होती. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी विचार करून ही युती केली. आता २०१९ साली झालेल्या घटनांमध्ये सत्तेसाठी विचार बाजूला ठेवले आणि खुर्ची-सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली – एकनाथ शिंदे</p>

18:18 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: ही वज्रमूठ नव्हे, ही तर वज्रझूठ – एकनाथ शिंदे

चांगले लोक एकत्र येतात त्याला वज्रमूठ म्हणतात. ही तर वज्रझूठ आहे. सगळे खोटे लोक एकत्र आले आहेत. खरंतर सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठिशी घालणं, त्यांच्यासोबत बसणं ही कसली वृत्ती आहे? संभाजीनगर ही घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. तिथेच ही सभा होतेय यापेक्षा दुसरं दुर्दैवं काय असेल? सत्तेसाठी वेळोवेळी कोलांटउड्या मारणं चालू आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? – एकनाथ शिंदे

18:16 (IST) 2 Apr 2023

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळाभेटी घेत आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. हे दृश्य वेदनादायी आणि राज्यासाठी दुर्दैवी आहे – एकनाथ शिंदे

18:15 (IST) 2 Apr 2023
…अशी भावना सावरकर गौरव यात्रेमागे होती – एकनाथ शिंदे

सावरकर गौरव यात्रा कालपासून सुरू झाली. सावरकरांचा त्याग, बलिदान, त्यांनी समर्पित भावनेनं देशासाठी काम केलं, हालअपेष्ठा भोगल्या, अंदमानात शिक्षा भोगली. सावरकरांची अशा प्रकारे जाणीवपूर्वक अवहेलना केली जात आहे. हा सगळ्या स्वातंत्र्यवीरांचा अवमान आहे. देशवासीयांचा अवमान आहे. त्यांचं कार्य, बलिदान, त्याग सगळीकडे पोहोचायला हवा, यासाठी आम्ही ही यात्रा काढली. त्यांची अवहेलना करणाऱ्या प्रवृत्तींना सडेतोड उत्तर मिळायला हवं, अशीही भावना त्यात होती – एकनाथ शिंदे

18:12 (IST) 2 Apr 2023
“साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…

अलीकडच्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. अशातच आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता शिर्डीचे साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

वाचा सविस्तर…

18:12 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: उद्धव ठाकरे सभास्थळाच्या दिशेनं रवाना

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सभास्थळाच्या दिशेनं रवाना झाले आहेत…

18:11 (IST) 2 Apr 2023
“बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर…”, ‘त्या’ प्रकरणावरून शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी राहुल गांधींनी केली होती. यानंतर राहुल गांधींवर देशभरातून टीका होत आहे. तर, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेच्या ( शिंदे गट ) वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहेत. आज ( २ मार्च ) ठाण्यात गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा माजी महापौर नरेश मस्के यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

वाचा सविस्तर…

18:10 (IST) 2 Apr 2023
आम्ही अयोध्येच्या मुद्द्याकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही – एकनाथ शिंदे

आम्ही सर्वांना सोबत घेऊन येत्या ९ तारखेला अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहोत. मधल्या घडामोडींमध्ये काही आमदार, मंत्र्यांना विमानातून उतरावं लागल्यामुळे दर्शनाची संधी हुकली होती. त्यामुळे आता आम्ही ९ तारखेला जातोय. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, अस्मितेचा विषय आहे. आम्ही त्याकडे कधी राजकारणाच्या नजरेनं पाहिलं नाही, पाहणार नाही. दुसऱ्यांचं मी काही सांगू शकत नाही – एकनाथ शिंदे

18:09 (IST) 2 Apr 2023
एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेतून संवाद…

बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना अपेक्षित काम करत असताना शिवधनुष्य आम्हाला शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मिळालं. यावरून शिवाजी महाराज, आई भवानी, बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादच आमच्या पाठिशी आहे हे दिसून आलं अशी आमची भावना आहे – एकनाथ शिंदे

18:07 (IST) 2 Apr 2023
MVA Rally: अजित पवार-जयंत पाटील पोहोचले…

अजित पवार आणि जयंत पाटील सभास्थळी पोहोचले आहेत..

महाविकास आघाडीची संयुक्त सभा (संग्रहीत छायाचित्र)

MVA Rally vs BJP’s Savarkar Yatra: महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेतील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!