ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. नाशिकमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीत्यांना पत्रकारांनी अजित पवारांच्या भाषणावरुन प्रश्न विचारला. अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे. तसंच भुजबळांना आम्हीच येवलाची जागा लढवायला देऊन सेफ केलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोरारजी देसाई ८४ व्या वर्षी देशाचे पंतप्रधान होते

वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- तुम्ही परत या मी निघून जाईन, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवार गटाला आवाहन

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव मी पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केलं होतं. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता असंही आज शरद पवार यांनी सांगितलं.

हे पण वाचा- ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची! शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याआधी रोहित पवारांनी केलेलं ट्वीट चर्चेत

पाऊस पडला पाहिजे ही वरुणराजाला प्रार्थना

माझी भूमिका मांडण्याची सुरुवात करण्यासाठी आज मी बाहेर पडलो आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी इथे येत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, सुप्रिया आम्हा सगळ्यांचं लोकांनी स्वागत केलं. आनंद एका गोष्टीचा आहे की वरुणराजाने स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारत होतो की पावसाची स्थिती काय आहे? मला हे सांगण्यात आलं की रिमझिम आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी नाशिकपासूनच सुरुवात का केली?

मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Na tired hoon na retired hoon sharad pawar taunts ajit pawar with atal bihari vajpayee lines scj