दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या चौरंगी लढतीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारासाठी थेट मतदार संपर्कावर जोर दिला असला तरी या निवडणुकीत खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे या नेतेत्रयींचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या या नेत्यांकडून दापोली नगरपंचायत निवडणुकीकडे विधानसभेचीच रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीनंतर झालेली नवनिर्वाचित मंडणगड नगरपंचायत निवडणूकही आमदार संजय कदम, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि केदार साठे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र या नवनिर्मित नगरपंचायत क्षेत्रात अतिशय कमी मतदारसंख्या असल्याने या निवडणुकीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. या निवडणुकीत आमदार संजय कदम यांच्या पुढाकाराने महाआघाडी पॅटर्नने बाजी मारली. आता खेडसह दापोलीत त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी संजय कदम यांनी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. आमदार असल्याने त्यांनी दिलेल्या विकासाच्या आक्रमक आश्वासनांबाबत अल्पसंख्यांकांसह सर्वच समाजात त्याचे अनुकूल पडसाद उमटत आहेत.

दरम्यान, मंडणगडमधील निवडणुकीनंतर रामदास कदम यांनी चिरंजीव योगेश कदम यांना विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून जाहीर करून संजय कदम यांना थेट आव्हान दिले. मात्र शिवसेनेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी या मोच्रेबांधणीला आक्षेप घेतल्याने योगेश कदम यांना विधानसभेसाठीच्या आक्रमक प्रचाराबाबत काहीशी माघार घ्यावी लागली. मात्र दापोली नगरपंचायत निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी उमेदवारांना ‘र्सवकष’ मदतीचे प्रयत्न सुरू करून दापोलीतील संभाव्य प्रतिकूलतेची तीव्रता कमी करण्याचे धोरण आखले आहे.

दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवणाऱ्या केदार साठे यांनी शहरात पहिल्या क्रमांकाची मते मिळवून स्वतसह पक्षाचे वर्चस्व नव्याने सिद्ध केले होते. त्याच पाश्र्वभूमीवर दापोली नगरपंचायत क्षेत्रात पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी अल्पसंख्यांक समाजातील पाच  नेत्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र साठे यांच्या मोच्रेबांधणीला नोटाबंदीमुळे तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या परिस्थितीत दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी, शिवसेना, भाजप आणि मनसे अशी चौरंगी लढत असली तरी या निवडणुकीतून खऱ्या अर्थाने आमदार संजय कदम, योगेश कदम आणि केदार साठे यांचेच भवितव्य ठरणार असल्याचे मत राजकीय निरीक्षकांत व्यक्त केले जात आहे.