Lok Sabha Session 2024 : १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. आज (२५ जून) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाचं कामकाज पुढील १० दिवस चालणार आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देत आहेत. खासदारकीची शपथ देत असताना हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी खासदारीची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत नागेश पाटील आष्टीकर यांना थांबवल. त्यानंतर आष्टीकरांना पुन्हा शपथ घ्यावी लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in