नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात जर्मनीने गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली असून, सौर ऊर्जेवर धावणारी नागपूर मेट्रो जगातील पहिली रेल्वे ठरणार आहे, असे नागपूर रेल्वे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले.
दीक्षित हे जर्मनीच्या दौऱ्यावरून नुकतेच परत आले. त्याविषयी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. नागपूर मेट्रो प्रकल्पात ३० मेगाव्ॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महिनाअखेरीस जर्मनी तज्ज्ञांची चमू नागपुरात येत आहे. इंडो-जर्मनी सोलर कॉर्पोरशन कार्यरत आहेत. भारत आणि जर्मनीमध्ये औपचारिकता पूर्ण होऊन करार झाल्यास नागपूर मेट्रो रेल्वे अशाप्रकारची जगातील पहिली ठरणार आहे. या प्रकल्पावर २०० कोटी रुपयांची गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ‘सोलर पॅनल’साठी लावण्यासाठी अतिरिक्त जागेची गरज भासणार नाही. मेट्रो स्थानकाच्या इमारतीवर त्या बसवण्यात येतील. या इमारतींचे डिझाईन त्याप्रकारे करण्यात येईल, असेही ते म्हणाले. नागपूर मेट्रो रेल्वेला लागणाऱ्या ऊर्जेच्या ४० टक्के ऊर्जा सौर ऊर्जा राहणार आहे. उर्वरित ऊर्जा औष्णिक औष्णिक ऊर्जा राहील. २०६० मध्ये नागपूरची लोकसंख्येचा किती असेल याचा अंदाज बांधून नागपूर मेट्रो रेल्वे योजना आखण्यात आली आहे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
मातीचे सर्वेक्षण आजपासून
मेट्रो रेल्वे मार्गासाठी खांब उभारण्यात येणार आहेत. त्याआधी जमिनीचा प्रकार जाणून घेतला जाणार आहे. त्यासाठी उद्या, शुक्रवारपासून सर्वेक्षणाला प्रारंभ होता. झिरो माईलजवळील पहिला खड्डा खोदण्यात येणार आहे. याचे काम गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आले असून, तीन महिन्यात ३७० खड्डे खोदून माती परीक्षणाचा अहवाल सादर करायचा आहे.

Story img Loader