विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तुळजापूर रेल्वे ट्रॅक खालची माती वाहून गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. तसेच येत्या ४८ तासांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील जलसंचय पातळी झपाटय़ाने वाढली असून जुलैच्या मध्यापर्यंत ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचण्याची ही दशकभरातील पहिलीच वेळ आहे. विदर्भातील १३ मोठय़ा आणि २४ मध्यम प्रकल्पांमधून पाणी सोडण्याची वेळही जलसंपदा विभागावर आली आहे, हाही अलीकडच्या इतिहासातील उच्चांक आहे.
मुसळधार पावसामुळे कोलमडलेली नागपूर रेल्वेसेवेतील  ७२ गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तर नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर-अमरावती पॅसेंजर आणि अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

(संग्रहित छायाचित्र)

Story img Loader