नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारलीय. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिलाय. यानंतर ३ जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं दिसलं. दवलामोटी मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना आधी भाजपाच्या ममता जैस्वाल यांच्या विजयाची बातमी आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा आनंद केवळ १० मिनिटांचा ठरला. त्यानंतर लगेचच मतांची पुन्हा मोजणी झाली आणि काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी १० मतांनी विजय मिळवला.
नेमकं काय झालं?
दवलामोटी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना आधी भाजपाच्या ममता जैस्वाल यांच्या विजयाची बातमी आली. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, लगेच १० मिनिटांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपसह काँग्रेसच्या उमेदवाराला बोलावून त्यांच्यासमक्ष फेरमतमोजणी केली. यावेळी काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी १० मतांनी विजय मिळवला. यानंतर सुलोचना ढोक यांनी भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर स्वतः निकाल घोषित करत जल्लोष केल्याचा आरोप केला.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार
१. केळवद – सुमित्रा कुंभारे – काँग्रेस<br>२. वाकोडी – ज्योती सिरसकर – काँग्रेस
३. राजोला – अरुण हटवार – काँग्रेस
४. गुमथाळा – दिनेश ढोल – काँग्रेस
५. वदोडा – अवंतीका लेकुरवाळे – काँग्रेस
६. आरोली – योगेश देशमुख – काँग्रेस
७. करंभाड – अर्चना भोयर – काँग्रेस
८. निलडोह – संजय जगताप – काँग्रेस
९. गोधणी (रेल्वे) – कुंदा राऊत – काँग्रेस
१०. येनवा – समीर उमप – शेकाप
११. डिगडोह – रश्मी कोटगुले – राष्ट्रवादी
१२. भिष्णुर – प्रवीण जोध – राष्ट्रवादी
१३. बोथीय पालोर – हरिष उईके – गोंडवाना
१४. पारडशिंगा – मीनाक्षी सरोदे – भाजप
१५. सावरगाव – पर्वता काळबांडे – भाजप
१६. डिगडोह-इससानी – अर्चना गिरी – भाजप
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणाला किती जागा?
जिल्हा | भाजप | शिवसेना | राष्ट्रवादी | काँग्रेस | इतर | निकाल जाहीर | एकूण जागा |
अकोला | १ | १ | २ | १ | ९ | १४ | १४ |
धुळे | ८ | २ | ३ | २ | ० | १५ | १५ |
नंदूरबार | ४ | ३ | १ | ३ | ० | ११ | ११ |
नागपूर | ३ | ० | २ | ९ | २ | १६ | १६ |
पालघर | ५ | ५ | ४ | ० | १ | १५ | १५ |
वाशिम | २ | १ | ५ | २ | ४ | १४ | १४ |
एकूण | २३ | १२ | १७ | १७ | १६ | ८५ | ८५ |