उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागील विधानसभा निवडणुकीतील भाषणं त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चांगलीच चर्चेत होती. त्यावर अनेक मीम्सही तयार झाले. यावरूनच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीसांचा एक किस्सा सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस भाषणात स्वर वरचा लावायचे असं नाना पाटेकरांनी सांगितलं. तसेच तो वरचा स्वर लावू नका असा सल्ला दिल्याचंही नमूद केलं. यावर देवेंद्र फडणवीसांनी होकार देत तो किस्सा सांगितला. ते मंगळवारी (११ ऑक्टोबर) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या भाषणातील आवाजाची तीव्रता कमी होण्याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांना जातं. मला जाहिरपणे सगळ्यांना सांगायचं आहे की, विधानसभा निवडणुकीच्या माझ्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा आणि म्हणायचे अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल.”

Ajit Pawar News
Assembly Election Result : सहा महिन्यांत काँग्रेसच्या मतांमध्ये सहा टक्क्यांची घट; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दमदार कामगिरी
Maharashtra Assembly Election Results Candidates Who Won By the Highest and Lowest Margin
Highest And Lowest Margin : भाजपाच्या ‘या’ उमेदवाराने…
Nana Patole Lost His Seat From Sakoli
Nana Patole : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निवडणुकीत पराभव
Rais Shaikh News
भिवंडी पूर्वमध्ये सपाचे रईस शेख विजयी; म्हणाले, “विजयाचा मला आनंद आहे, पण…”
Nitin Gadkari News
Nitin Gadkari : “करंट जाणवत होता, पण विश्वास वाटत नव्हता की…”; विधानसभेत महायुतीच्या विजयानंतर गडकरींची प्रतिक्रिया
Sangamner election Balasaheb Thorat Amol Khatal
सायबर कॅफे चालक युवक झाला आमदार, संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा केला धक्कादायक पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Mahayuti Politics
Mahayuti : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाची कारणं कोणती? कोणते मुद्दे ठरले निर्णयाक? वाचा!
MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”

“मी पुढचं भाषण ऐका म्हणायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो”

“मी त्यांना कबुल करायचो की तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका आणि भाषणाला उभा राहून पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नाना पाटेकरांचा फोन यायचा. मात्र, हळूहळू मी प्रयत्न करून ते बदललं आणि आत्ता मी ते पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे याचं १०० टक्के श्रेय नाना पाटेकर यांचं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा

“गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित दादा”

फडणवीस यांच्या उत्तरावर नाना पाटेकर म्हणाले, “कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवार यांना आहे. गाण्यात लता दिदी आणि बोलण्यात अजित दादा हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही भाषणाची पूर्ण शैली बदलून टाकली आहे.”