आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील पक्ष मोर्चेबांधणी करू लागले आहेत. काँग्रेसनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाला सत्तेपासून बाजूला करायचं हा एकमेव उद्देश असल्याचं काँग्रेस नेते सांगत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या बैठका वाढल्या आहेत. भाजपाविरोधात तिन्ही पक्षांनी वज्रमूठ तयार केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष त्यांच्या मित्र पक्षांसह एकत्र लढतील अशी चिन्हं दिसत आहेत. तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी तीन-तीन प्रमुख नेत्यांची समिती तयार केली आहे. ही समिती आगामी काळात जागावाटपावर निर्णय घेईल.

who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “आधीचं सरकार बहिरं होतं”, मुख्यमंत्री…
Uddhav thackeray Manifesto
Uddhav Thackeray Manifesto : सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणती वचने दिली?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?
sharad ponkshe on maharashtra assembly election
Video: “…तेव्हा आपले सांस्कृतिक मंत्री म्हणाले, तुम्ही नथुराम करत होता?” शरद पोंक्षेंची ‘राजकीय’ टोलेबाजी!
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Live : “देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या ताईंची बदली झाली”; संजय राऊतांचा चिमटा
Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढतील असं बोललं जात आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. काँग्रेच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना याबद्दल पुन्हा एकदा विचारण्यात आलं.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आम्ही आधीच सांगितलं आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा नगरपालिकेची, जिथे जिथे जशी परिस्थिती असेल, तिथल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.