नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने घोषणा केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच शुभांगी पाटील यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकासआघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
नाना पटोले म्हणाले, “अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी (१६ जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकासआघाडीचा उमेदवार जाहीर करू. नागपूरवरही चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवार महाविकासआघाडी म्हणून लढतील.”
हेही वाचा : उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा
“बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड”
“महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकासआघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.
हेही वाचा : काँग्रेसकडून निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला कारवाईबाबत…”
“भाजपानं सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप केलं”
“पैशांच्या भरवशावर, सत्तेच्या जोरावर घरं फोडण्याचं पाप भाजपाने केलं. त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील,” असा इशाराही नाना पटोलेंनी भाजपाला दिला.
दरम्यान, नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना या बंडखोरीवर सडकून टीका केली. “डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपाचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोलेंनी व्यक्त केली होती.
हेही वाचा : सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबितच विधान परिषद निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी आघाडीचे डावपेच
हेही वाचा :
“नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असना देखील डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तेथे अपक्ष म्हणून त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला. भाजपाने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपाचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही,” अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.