राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी अजित पवार भाजपात केल्यास त्यांची काय अवस्था होईल? असा प्रश्न विचारला. त्यावर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (१८ एप्रिल) अकोल्यात बोलत होते.

“अजित पवार भाजपात गेले तर त्यांची काय अवस्था होईल?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर पटोले म्हणाले, “मी भाजपा सोडून आलोय, मी अडीच वर्षे बाकी असताना खासदारकी सोडली आहे. भाजपाचे लोक कसे आहेत, हे मला माहिती.”

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

“भाजपाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे”

“मी २०१७ मध्ये सांगितलं होतं की, ते देश बरबाद करायला निघाले आहेत. आज देशाच्या जनतेला जाणीव झाली आहे. मी तेव्हा जे वक्तव्य केलं होतं ते आज देशाची जनता भोगते आहे. भाजपा लोकशाहीविरोधी पक्ष आहे. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत,” असं पटोलेंनी सांगितलं.

हेही वाचा : भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या…”

“ईडी-सीबीआयचा वापर करून दाबण्याचा प्रकार सुरू”

भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’वर बोलताना नाना पटोले म्हणाले, “कमळ हा शब्द प्रेमाचा संदेश देणारा शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांची घरं तोडणारा होऊ शकत नाही. ईडी व सीबीआय ही दोन माकडं केंद्र सरकारने पोसली आहेत. त्याच्या माध्यमातून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम सुरू झालं आहे. ईडी-सीबीआयचा वापर करून लोकशाहीच्या सर्व यंत्रणांना दाबण्याचा प्रकार सुरू आहे. हे लपून राहिलेलं नाही, सर्व देशाला कळत आहे.”

“मोदी-भाजपा सरकार या देशाला बरबाद करण्याचं काम करतंय”

“आमची भूमिका स्पष्ट आहे की, लोकशाहीतील हुकुमशाही प्रवृत्तीपासून देशाचं संविधान, लोकशाही वाचवणं. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या देशात सुई बनत नव्हती. ६० वर्षात हा देश सुईपासून रॉकेटपर्यंत गेला. देशाला महासत्ता बनवलं. देशातील जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. आज मोदी आणि भाजपाचं सरकार या देशाला बरबाद करण्याचं काम करत आहे. त्याविरोधात आमची लढाई आहे,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

“अजित पवार भाजपाबरोबर जातील असं मला वाटत नाही”

“अजित पवार भाजपाबरोबर जातील असं मला वाटत नाही. आम्ही परवाही वज्रमुठ सभेच्या माध्यमातून नागपूरला सोबत होतो,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

Story img Loader