काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊतांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचं वक्तव्य केल्याबाबत नाना पटोलेंना विचारणा झाली. यावर नाना पटोलेंनी संजय राऊतांना चाटूगिरी आणि चोंबडेपणा करू नका, असं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला. ते बुधवारी (३ मे) एबीपी माझाशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणं सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडलं आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं आहे. मल्लिकार्जून खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्ष आमदार-खासदार होते.”

Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Congress city president MLA Vikas Thackeray
“आमदार पुत्र आहे म्हणून झुकते माप नको, निष्पक्ष चौकशी व्हावी”, काय म्हणाले काँग्रेस आमदार…
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
Congress president Mallikarjun Kharge and Rahul Gandhi discussed about strengthening the party organization
संघटना मजबुतीसाठी काँग्रेसचे विचारमंथन
mahavikas aghadi jode maro andolan marathi news
महाविकास आघाडीचे आज ‘जोडे मारो’ आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उपस्थिती

“गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणं म्हणजे चोमडेपणा”

“संघटनेत मल्लिकार्जून खरगे ब्लॉक अध्यक्षापासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. मल्लिकार्जून खरगेंच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणं आणि गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणं म्हणजे चोमडेपणा आहे. संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा. हे चुकीचं आहे. ते अशाप्रकारे दुसऱ्यांचे प्रवक्ते होतात,” अशी टीका नाना पटोलेंनी केली.

हेही वाचा : VIDEO: “शरद पवारांचा राजीनामा हा मास्टर स्ट्रोक, कारण…”, मनसेचे आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“राऊतांनी आमच्या पक्षात फार चोमडेपणा करू नये”

“परवा अजित पवारांनीही संजय राऊतांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते होऊ नका सांगितलं. त्यांनी आमच्याही पक्षात फार चोमडेपणा करू नये, असाच आमचा सल्ला आहे,” असा टोला पटोलेंनी राऊतांना लगावला.