अजित पवारांबरोबर २०१९ मध्ये झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना केला होता. यावरून आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देंवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर या गोष्टीचा साक्षातकार कसा झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात, अदाणींचं पाप…” BBCवरील कारवाईवरून अमोल मिटकरींचं मोदी सरकार टीकास्र!

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

“देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर मी जास्त काही बोलणार नाही. मात्र, या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आताच त्याचा साक्षात्कार कसा झाला? ते आधी का बोलले नाहीत? अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
तसेच काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्त्वाचा नाही, तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्त्वाचे आहेत”, असेही ते म्हणाले.

“आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे”

“महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे? कापूस, कांदा, सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि केंद्र सरकार कापसाच्या गाठी आयात करत आहे. महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. आमदार सुरक्षित नाहीत. जनता सुरक्षित नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फुसकीसोडून लोकांना मुळ मुद्द्यांपासून दुसरीकडे वळवायचे, ही भाजपाची खेळी आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – “५६ इंचाची छाती किती भित्री, हे…”; BBCवरील कारवाईवरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका!

“राज्यात सध्या असंवैधानिक सरकार”

पुढे बोलताना, “२०१९ साली काय झालं, यावर आज चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. या घटनेला खूप कालावधी लोटला आहे. त्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. मुळात देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली काय झाले होते, तेही सांगावे. त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते. सत्तेसाठी भाजपा काहीही करते. आताही राज्यात असंवैधानिक सरकार आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.