मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरून धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खरंतर, ही घटना दोन महिन्यांपूर्वीची असून मणिपूरमधील पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. परंतु या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली. स्वतः सर्वोच्च न्यायालयाने या व्हिडीओची दखल घेत मणिपूर सरकारला गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. देशभरातला संताप आणि सरन्यायाधीशांनी खडसावल्यानंतर मणिपूरमधील प्रशासकीय सूत्र हलू लागली. परंतु, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या या भूमिकेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल, तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आमदार अतुल भातखळकर यांनी न्यालयावरच आक्षेप घेतल्यानंतर आता भातखळकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी “भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे” असं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा >> “मणिपूर घटनेप्रकरणी भाजपाच्या मनात गुन्हेगारी भावना, म्हणूनच त्यांनी…”, बाळासाहेब थोरातांचा टोला

महाराष्ट्राच्या विधानसभेत मणिपूर घटनेप्रकरणी अध्यक्षांनी बोलू न दिल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग केला. यावेळी नाना पटोलेदेखील विधीमंडळातून बाहेर पडले. विधीमंडळाबाहेर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. त्यांचे आमदार सरन्यायाधीशांच्या कामावर ताशेरे ओढतायत, त्यांच्याविरोधात ट्वीट करत आहेत. संविधानिक व्यवस्थेत सुप्रीम कोर्टाला खूप महत्त्व आहे, हे माहिती असूनही हे लोक कोर्टावर ताशेरे ओढायची हिंमत करतात. कारण त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यांच्या ट्वीटमधून ती मस्ती दिसतेय.

Story img Loader