काँग्रेसचे नेते नाना पटोले आता लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर विधानसभेच्याही रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून त्यांना भंडाऱ्यातील साकोलीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपाने पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उतरवले असल्याने, येथील लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसकडून काल रात्री उशीरा नाना पटोले यांच्या उमेदवारीचे पत्रक जारी करण्यात आले आहे. पटोले हे काँग्रेसचे नेते असून साकोली विधानसभा त्यांचे गृहक्षेत्र असल्याने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. शिवाय या अगोदर २००९ मध्ये साकोली मतदारसंघातुनच ते विधनासभेवर निवडून गेले होते.  तर भाजपाचे उमेदवार डॉ.परिणय फुके यांना देखील मंत्रीपद मिळाल्यानंतर अल्पावधीतच भंडारा-गोंदिया ही जिल्हे पिंजून काढून येथील जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमधील लढत ही चुरशीची होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात बंड पुकारत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात नागपूरमधून लोकसभा निवडणूक लवढवली. मात्र त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता पटोले पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole named as the congress candidate from sakoli assembly constituency msr
Show comments