भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दुसऱ्यांचं वस्त्रहरण करणाऱ्याचंच आज वस्त्रहरण झालं, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

नाना पटोले प्रसिद्धी पत्रकात म्हणाले की, भाजपाने मागील नऊ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप केलं आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडीओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवला आहे, तो पूर्ण बघितल्यानंतरच यावर जास्त बोलणं योग्य होईल. परंतु दुसऱ्यांचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण झालं आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?

हेही वाचा- आठ तासांचे VIDEOS आणि पक्षातील मराठी महिलांचा छळ; पेनड्राईव्ह जमा करत अंबादास दानवेंचा सोमय्यांवर गंभीर आरोप

किरीट सोमय्या यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, २०१४ पासून राज्यात सीबीआय, ईडी आणि आयकर विभागासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरू आहे. भाजपाने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जी व्यक्ती दुसऱ्यांचं वस्त्रहरण करत होती, त्याच व्यक्तीचं आता वस्त्रहरण झालं आहे. पण हा मुद्दा काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा नाही, तर काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा- किरीट सोमय्या VIDEO प्रकरण; शहाजीबापू पाटलांची देवाकडे प्रार्थना, नेमकं काय मागितलं?

महागाई गगनाला भिडली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकार विधानसभेत घोषणा करते पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नाही, हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठा गंभीर आहे. सरकारी नोकर भरती करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. राज्यात ५० ते ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु ती भरली जात नाहीत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.

Story img Loader