केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथील पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, आता त्यांना महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंवर पवारांची मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

नाना पटोले म्हणाले की, ”आम्ही तर आज दिवसभर नांदेडला कार्यक्रमात होतो. तिथं आम्हाला ही घटना कळाली. आता मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री बैठकीस होते, दोघांनाही आम्ही भेटलो. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील होते. महाराष्ट्रात भाजपाच्या माध्यामतून नवीन घटना घडत आहेत, ज्या कधी राज्यात घडल्याच नाहीत. ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतही नाही. मुख्यमंत्र्यांबद्दलचं या पद्धतीचं वक्तव्य केंद्रीयमंत्र्यांनी करावं, ही निषेधार्य बाब आहे. काँग्रेसच्यावतीने त्याचा निषेध देखील आम्ही सकाळी ही घटना माहिती झाल्यावर केलेला आहे.”

“नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना ठाण्याला पाठवून शॉक दिले पाहिजे”

तसेच, ”रेमडेसिविरच्या प्रकरणात देखील राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते ब्लॅकमार्केटिंग करणाऱ्या त्या रेमडेसिविरवाल्याला सोडावयला रात्री पोहचले होते. एक केंद्रीय राज्यमंत्री तर पंतप्रधानांच बैल म्हणतात, यांची जीभ का घसरते? महाराष्ट्राच्या या संस्कृतीत भाजपाने असं वर्तन का करावं? हे कुणालाच कळायला कारण नाही. जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात या गोष्टीचा निषेध होतोय.” असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं.

“मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणेंचं खळबळजनक विधान!

याचबरोबर ”मुख्यमंत्री हे राज्याच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याबद्दलच असं वक्तव्यं केलं गेलं, म्हणून जनतेमधून याचा निषेध केला जातोय. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो. तुम्ही पाहीलं असले की सोशल मीडियावर देखील कुणी एखादी आक्षेपार्ह पोस्ट पाठवली, तर त्याच्यावरही गुन्हे दाखले केले जातात. कारवाई केली जाते. अनेक घटना आपण मागील मुख्यमंत्र्यांच्याही काळात पाहिल्या, आताही पाहिल्या आहेत. पंतप्रधानावर जर कोणी टिप्पणी केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते. पण अशा पद्धतीचं वक्तव्यं, थेट बोलावं ही गोष्ट खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात ही भूषणावह नाही. म्हणून कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, जी कायदेशीर कारवाई होते आहे, ती होणारच.” असंही नाना पटोलेंनी बोललं आहे.

Story img Loader