ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं.

या घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला असून राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सभागृह तहकूब झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावरही टीकास्त्र सोडलं.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
loksatta readers response
लोकमानस : भारतालाही फटका बसण्याची शक्यता
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा

हेही वाचा- संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची भाजपाची मागणी, विधानसभा अध्यक्षांना दिलं पत्र; विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं भोवणार?

नाना पटोले यावेळी म्हणाले, “सत्ताधारी पक्षाने ठरवून सभागृह बंद पाडलं. व्याजदरवाढ, शेतकऱ्यांच्या शेती पंपाचं कनेक्शन कापणं, मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई यावरून विरोधकांकडून आज हमला होणार, हे भाजपाला माहीत होतं. अशा प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतील, त्यामुळे आजचा दिवस कसा मोडून काढता येईल, अशी रणनीती सत्ताधारी पक्ष भाजपाने आखली होती.”

हेही वाचा- विधिमंडळाबाबत केलेल्या विधानावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण, विरोधकांच्या हक्कभंगाच्या मागणीवरही केलं भाष्य; म्हणाले, “माझ्यावर जर…”

“संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. विधीमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही. राऊतांच्या विधानाबाबत कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना होता. भाजपाच्या सदस्यांकडून हक्कभंगही आणला होता. त्यावर तातडीने निर्णय द्यायला हवा होता. याला सभागृहात कुणाचाही विरोध नव्हता. तरीही त्यांनी पूर्ण दिवसाचं सभागृहातील कामकाज तहकूब केलं. म्हणजे एकप्रकारे राज्यातील जनतेच्या घामाच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. भाजपाने सभागृह बंद पाडून जनतेच्या जखमेवर विशेषत: शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.

Story img Loader