खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर टीका केली आहे. विरोधकांची विस्कळीत आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकणार नाही. ही अनैतिक आघाडी आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं. याला काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीमुळे त्यांचे सरकारबरोबर अनैतिक संबंध जुळले आहेत, असं टीकास्र नाना पटोले यांनी पटेलांवर सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

“देशपातळीवर पंतप्रधान मोदी यांना पर्याय नाही. मोदींच्या विरोधासाठी एकत्र आलेली विस्कळीत आघाडी त्यांचा सामना करू शकणार नाही. केवळ फोटोसेशनपुरत्या बैठका आहेत. एकमताने साधं लोगोचं अनावरण होऊ शकत नाही. देश जुळणारच नाही तर जिंकणार कसा? त्यामुळे ही अनैतिक आघाडी आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “जालन्यात मराठा आंदोलकरांवरील लाठीचार्जच्या घटनेला पोलीस नाहीतर…”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “पटेल स्वत:बद्दल बोलले आहेत का? त्यांचे ईडीमुळे सरकारबरोबर अनैतिक संबंध जुळले आहेत. ईडी आणि अनैतिकता सारखीच आहे. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत, हे देशातील शेवटच्या माणसाला समजलं आहे.”

हेही वाचा : फेरविचार, क्युरेटिव्ह याचिकांच्या कारणास्तव मराठा आरक्षणासाठी दोन वर्षे वाया

“ईडीमुळे हे सरकारमध्ये सामील झाले,’ असं शरद पवारांनी सांगितलं. स्वाभिमानाने लोक एकत्रित येतात, त्याला अनैतिकता म्हणत नाहीत,” अशा शब्दांत पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole reply prafull patel on india critics ssa