महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीत नाशिक, नागपूर आणि अमरावतीच्या उमेदवारीवरून बराच गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. मी आज ( १७ जानेवारी ) अमरावतीत आहे. उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माहिती माध्यमांना देऊ,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

हेही वाचा : सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार? गिरीश महाजनांचं सूचक विधान; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”

संजय राऊत काय म्हणाले?

“काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही. शिवसेनेने शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला आहे. याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचं, तर सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे नागपूरची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : “अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली, तेव्हा…”; डाव्होस दौऱ्यावरून संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

“महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. पुन्हा गोंधळ होऊ नये, हा धडा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाने घेतला पाहिजे. प्रत्येक वेळा त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवर असते. हा त्याग आम्ही करत आलो आहोत. पण, यापुढे असं होणार नाही,” असं इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.