वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काल (५ नोव्हेंबर) नांदेड येथील सभेत बोलताना काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. नांदेडकर आणि लातूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर भाजपाची बी टीम आहेत. ते भाजपाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत, असे नाना पटोले म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> “सावित्रीबाई फुले मोठं कुंकू लावायच्या, मग..,” संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा भुजबळांनी घेतला समाचार
आपल्या राज्यात एक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर भाजपाचे प्रवक्ते झाले आहेत, असे त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं. ते भाजपासाठी काम करत आहेत. काँग्रेसमधून कोणीही सोडून जाणार नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा >>> बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ का लागतोय? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले “वारसा वास्तुंसाठी काही…”
महाराष्ट्रात ईडीचं भाजपाप्रणित सरकार आहे. महिलांचा सन्मान न ठेवणे हा भाजपाचा धर्म आहे, अशी टीकादेखील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
हेही वाचा >>>गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; सुषमा अंधारेंचा भलत्याच शब्दांत केला उल्लेख, म्हणाले, “बाई आहे म्हणून…”
काँग्रेस पक्षातील नैतिकता संपली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील १६ जण बरखास्त झाले तर नांदेडकर आणि लातूरकर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत. ते देवेंद्र फडणीस यांना मस्का लावायला तयार आहेत. आमचं काहीच शिल्लक राहिलेलं नाही, असे काँग्रेसवाले मला म्हणत आहेत. आम्हाला लोकांना उत्तरं देता येत नाहीत, असे ते म्हणतात. त्यामुळे जे राहिलेलं आहे ते वाचवुया अशी स्थिती काँग्रेसची झाली आहे, असे प्रकाश आंबडेकर म्हणाले होते.