महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत नसल्याच्या चर्चा आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे नेते सातत्याने यावर बोलत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत. भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन तिघांनी मिळून ठरलेलं धोरण सांगत असताना यांच्या स्वतंत्र मुलाखती मात्र वेगळं दर्शवत आहेत. असं माझं निरीक्षण आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावत असेल तर त्यावर इलाज नाही. अजूनपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही. माध्यमांच्या चुकीच्या बातम्या, तसेच काही बातम्यांचा चुकीचा अर्थ लावून असा गैरसमज निर्माण केला जात असेल तर ते चुकीचं आहे.

maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

हे ही वाचा >> “नड्डा साहेबांचा पीए बोलतोय…”, मंत्रिपदासाठी भाजपा आमदारांकडे पैसे मागणाऱ्या भामट्याचा विकास कुंभारेंना फोन, म्हणाला…

नाना पटोले म्हणाले, जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची आमची भूमिका आधीपासून अशीच आहे. सर्वांचीच ती भूमिका आहे. त्याने गैरसमज करून घेण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू.