Nana Patole : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला. शाळेत काम करणारा सफाई कामगार अक्षय शिंदे यानेच हे घृणास्पद कृत्य केलं. १३ ऑगस्टला घडलेल्या या घटनेचे पडसाद २० ऑगस्टला बदलापूरला कसे उमटले ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी द्या अशी मागणी २० ऑगस्टच्या आंदोलनात करण्यात आली. या प्रकरणावरुन राजकारणही रंगलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी नामांकित शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं सांगत गंभीर आरोप केले आहेत.

बदलापूरमध्ये काय घटना घडली?

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुरड्यांचं लैंगिक शोषण केलं. १३ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा निषेध २० ऑगस्टला नोंदवण्यात आला. बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला होता. बदलापूर रेल्वे स्टेशनवर ९ तास रेल रोको करण्यात आला. तसंच आरोपी अक्षय शिंदेचं घर फोडण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी शाळा आरएसएसशी संबंधित असल्याने सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं असं म्हटलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

Badlapur Sexual Assault : “जबरदस्तीने स्त्रीचे कपडे काढले जातात, पण…”; बदलापूरमधल्या घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

काय म्हणाले नाना पटोले?

पोलीस कारवाई करत नाहीत, आरोपीला पकडत नाहीत म्हणून जनतेचा आक्रोश निर्माण झाला त्यातून आंदोलन निर्माण झालं. हा कुठल्याही राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात महिला अत्याचाराच्या सुमारे २२ हजार घटना घडल्याचंही नाना पटोलेंनी ( Nana Patole ) म्हटलं आहे.

शाळा संघ आणि भाजपाशी संबंधित आहे त्यामुळेच

महाराष्ट्र हा गुजरातधार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केलं गेलं. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन आले आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक आहे. सरकारमधले तिघे तिजोरी पोखरत आहेत अशी बोचरी टीका नाना पटोलेंनी ( Nana Patole ) केली.

Story img Loader